आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील मध्यवस्तीतील चार व्यापारी प्रतिष्ठानांना चोरट्यांनी लक्ष्य करून १ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी सकाळी कोतवाली हद्दीत तीन व राजापेठ हद्दीत एक व्यापारी प्रतिष्ठान फोडल्याच्या घटनांनी खळबळ उडाली होती.कापड व्यावसायिक सुरेंद्र परशुराम खत्री (५७,रा.एमआयडीसी रोड) यांचे जिजामाता संकुलातील कापड विक्रीचे प्रतिष्ठान आहे. रविवारी सकाळी ते प्रतिष्ठान उघडण्यास गेले असता त्यांना दुकानाचे शेटर वाकवून चोरांनी १०,३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निदर्शनास आले. अशोककुमार गगलानी यांच्या मालकीचे कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाला. राजन इंद्रजीत मेहता यांच्या लेडीज ड्रेस मटेरीयल प्रतिष्ठान फोडून चोरांनी १२ हजारांची रोख लंपास केली. या घटनेची तक्रार कोतवाली पोलिसांकडे नोंदविण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४५७, ३८०, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. चौथी घटना राजापेठ हद्दीतील नवाथे नगरात घडली. रोहित शाम कपूर (२७,रा.साईनगर) याच्या मालकीचे डीजे साऊन्ड प्रतिष्ठान चोराने फोडले. त्याच्या दुकानातील लाकडी दार टॉमीने तोडून चोरी केल्याचे निदर्शनास आले. या चोरीत राजापेठ पोलिसांनी एक संशयीत ताब्यात घेतला आहे. रोहीत कपुर यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला.आरोपी रविकिसन खडसेला अटककोतवाली हद्दीतील चोरी प्रकरणात पोलिसांनी रविकिसन खडसे (२९,रा.आदिवासीनगर) याला रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले. रविकिसन खडसे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३९२, ३८४, ३९९, ३८०, ३७९ असे विविध गुन्हे दाखल आहेत. शनिवारी रात्री तो तीन साथीदारासोबत शहरात फिरत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनात डीबी स्कॉडचे अब्दुल कलाम, प्रफुल खोब्रागडे, गजानन ढेवले, सागर ठाकरे यांनी आरोपी रविकीसन खडसेला ताब्यात घेतले
एकाच रात्री चार प्रतिष्ठाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:40 IST
शहरातील मध्यवस्तीतील चार व्यापारी प्रतिष्ठानांना चोरट्यांनी लक्ष्य करून १ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी सकाळी कोतवाली हद्दीत तीन व राजापेठ हद्दीत एक व्यापारी प्रतिष्ठान फोडल्याच्या घटनांनी खळबळ उडाली होती.
एकाच रात्री चार प्रतिष्ठाने फोडली
ठळक मुद्देराजापेठ, कोतवाली हद्दीतील घटना : एक लाखाचा मुद्देमाल लंपास