शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

वरुडमध्ये बनावट खतांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 01:40 IST

तालुक्यातील फत्तेपूर येथे डीएपी खताशी नामसाधर्म्य असलेल्या बनावट खताची विक्री होत असल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघड झाला. तेथून बनावट खतासह दोन वाहने जप्त करण्यात आली. आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. जिल्हा कृषी विकास अधिकारी कुर्बान तडवी यांच्या नेतृत्वात तालुका कृषी विभागाने ही कारवाई केली.

ठळक मुद्देवाहन जप्त : आरोपी पसार, सव्वा लाखांचे डीएपीसदृश ‘बीएपी’

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील फत्तेपूर येथे डीएपी खताशी नामसाधर्म्य असलेल्या बनावट खताची विक्री होत असल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघड झाला. तेथून बनावट खतासह दोन वाहने जप्त करण्यात आली. आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. जिल्हा कृषी विकास अधिकारी कुर्बान तडवी यांच्या नेतृत्वात तालुका कृषी विभागाने ही कारवाई केली. जप्त खताची किंमत १ लाख २७ हजार ४०० रुपये आहे.पसार आरोपीचे नाव नीळकंठ मधुकर ढबाले (३३, रा. जलालखेडा, ता. नरखेड, जि. नागपूर, श्री मारोती इंडस्ट्रीज परमल, एमआयडीसी सावनेर, जि. नागपूर) असे नाव आहे. ढबाले याने डीएपीशी मिळतेजुळते बीएपी नावाने बनावट खत परिसरात विक्री करण्याकरिता आणले होते. आरोपीने एमएच २७ एक्स ७६५२ व एमएच १२ एलटी ९९८९ या वाहनांमध्ये बनावट खताचे एकूण १०८ पोते विक्रीकरिता आणल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी उज्ज्वल आगरकर यांना मिळाली. यावरून कृषी विभागाच्या दक्षता पथकाने सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास फत्तेपूर येथे जाऊन धाडसत्र राबविले. यावेळी निळकंठ ढबाले पसार झाला. दोन्ही मालवाहू वाहन ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला तसेच वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या दोन्ही वाहनांत ‘बीएपी नवरत्न’ असे नाव असलेले श्री मारुती इंडस्ट्रीज परमल कासा ५० किलोचे ५० पोते, शक्तिमान सॉइल कंडिशनर नावाचे मायक्रो बायोटेक (एमआयडीसी सावनेर बॅच क्र. एएस१२१) चे ३० किलो वजनाचे २० पोते, चमत्कार सॉइल कंडिशनर नावाचे मायक्रो बायोटेक (एमआयडीसी सावनेर बॅच क्र. एमबीटी १२१/१७ ) चे ५० किलो वजनाचे ३८ पोते असे बनावट खत वरूड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. पोलिसांनी भादंविचे कलम ४२०, ३४ व खत नियंत्रण कायद्यातील सहकलमान्वये गुन्हा दाखल केला. ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एपीआय सुजित कांबळे करीत आहेत.गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. बनावट बियाणे व खताची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. असा प्रकार कुठेही आढळून आल्यास तालुका कृषी कार्यालयाला तात्काळ माहिती द्यावी. खते, बियाणे खरेदी करताना कंपनीचे नाव, बॅच नंबर, खरेदी तारीख नमूद असलेले पक्के बिल घ्यावे.- उज्ज्वल आगरकर, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती