ग्रामसेवकाला सीईओंनी ठोठावला ५०० रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:30+5:30

चांदूर बाजार पंचायत समिती अंतर्गत माधान ग्रामपंचायतींची ३९ (१)ची सुनावणी सोमवार, २० जानेवारी रोजी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठेवण्यात आली होती. यासाठी हजर झालेले माधान येथील ग्रामसेवक अमोल आडे हे सीईओंच्या दालनात पोहोचले. त्यावेळी त्यांच्या हातात कागदपत्र असलेली प्लॅस्टिक कॅरिबॅग सीईओंच्या दृष्टीस पडली.

Rural CEO punishes CEO for Rs | ग्रामसेवकाला सीईओंनी ठोठावला ५०० रुपयांचा दंड

ग्रामसेवकाला सीईओंनी ठोठावला ५०० रुपयांचा दंड

googlenewsNext
ठळक मुद्देझेडपीतील घटना : प्लॅस्टिक कॅरी बॅग आणणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या दालनात ग्रामपंचायतींच्या सुनावणीकरिता प्लॅस्टिक कॅरिबॅग घेऊन आलेल्या चांदूर बाजार तालुक्यातील एका ग्रामसेवकाला ५०० रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना सोमवारी मिनीमंत्रालयात घडली. सीईओंच्या या दणक्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.
चांदूर बाजार पंचायत समिती अंतर्गत माधान ग्रामपंचायतींची ३९ (१)ची सुनावणी सोमवार, २० जानेवारी रोजी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठेवण्यात आली होती. यासाठी हजर झालेले माधान येथील ग्रामसेवक अमोल आडे हे सीईओंच्या दालनात पोहोचले. त्यावेळी त्यांच्या हातात कागदपत्र असलेली प्लॅस्टिक कॅरिबॅग सीईओंच्या दृष्टीस पडली. त्यांनी याबाबत ग्रामसेवकाला जाब विचारला. दरम्यान सीईओ अमोल येडगे यांनी आॅन दी स्पॉटवर ग्रामसेवक अमोल आडे यांना ५०० रुपयांचा दंड ठोठाठला. सदर ग्रामसेवकांकडून दंडाची रक्कम जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आली. सीईओंच्या या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.

झेडपीतील पहिलीच कार्यवाही
जिल्हा परिषदेत केवळ या परिसरात प्लॅस्टिकचा वापर करण्यास मनाई असल्याचे स्टिकर मोक्याच्या ठिकाणी लावले होते. मात्र प्लॅस्टिक कॅरी बॅगचा वापर होत असताना याकडे दुर्लक्ष केले जात होते. परंतु खुद्द सीईओंनीच प्लॅस्टिक बंदी असल्याने याची अंमबजावणी दंड आकारून प्रभावीपणे केल्याची झेडपीतील ही पहिली घटना आहे.

Web Title: Rural CEO punishes CEO for Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.