शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या डोजसाठी बडनेरात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 05:00 IST

मागणीनंतर गेल्या तीन दिवसांपासून सर्वच केंद्रांवर जेमतेम लसीचे डोज मिळणे सुरू झाले. मात्र, कोव्हॅक्सिनचा अत्यल्प पुरवठा व कमी केद्रांमुळे  अमरावतीकरांनी बडनेरातील हरिभाऊ वाठ या केंद्राकडे लस टोचून घेण्यासाठी धाव घेतली. बडनेरा शहरात जेमतेम पुरवठ्यावर लसीकरण सुरू आहे चावडी चौकातील या केंद्रावर गेल्या दोन दिवसांपासून ज्यांचा दुसरा डोस आहे, त्यांनाच लसीकरण केले जात असल्याची माहिती येथील नोडल अधिकारी राहुल माहुरे यांनी दिली.

ठळक मुद्देदोन्ही केंद्रांवर नागरिकांच्या रांगा कोव्हॅक्सिनचा साठा तोकडा

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : शहरासह जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचे लसीकरण केंद्र जवळजवळ बंदच आहेत. साठादेखील तोकडा आहे. त्यामुळे जिथे ही लस उपलब्ध होईल तिथे नागरिकांची गर्दी होत आहे. सध्या बडनेरा जुन्या वस्तीतील हरिभाऊ वाठ लसीकरण केंद्रात ही लस उपलब्ध असल्याने अमरावतीहून शासकीय कर्मचारी व नागरिकांनी बडनेराकडे धाव घेतल्याने या केंद्रात अचानक गर्दी वाढली आहे.     जिल्ह्यात गेल्या १० ते १२ दिवसांपासून लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. मागणीनंतर गेल्या तीन दिवसांपासून सर्वच केंद्रांवर जेमतेम लसीचे डोज मिळणे सुरू झाले. मात्र, कोव्हॅक्सिनचा अत्यल्प पुरवठा व कमी केद्रांमुळे  अमरावतीकरांनी बडनेरातील हरिभाऊ वाठ या केंद्राकडे लस टोचून घेण्यासाठी धाव घेतली. बडनेरा शहरात जेमतेम पुरवठ्यावर लसीकरण सुरू आहे चावडी चौकातील या केंद्रावर गेल्या दोन दिवसांपासून ज्यांचा दुसरा डोस आहे, त्यांनाच लसीकरण केले जात असल्याची माहिती येथील नोडल अधिकारी राहुल माहुरे यांनी दिली.  येथील लसीकरण केंद्रांवर अमरावती शहरासह साईनगर, गोपालनगर, नवाथे व लगतच्या ग्रामीण परिसरातील लोक लस टोचून घेण्यासाठी येत आहेत. येथे लसींचा पुरवठा वाढविण्यासोबतच एखादे जास्तीचे केंद्र सुरू करण्याची गरज देखील निर्माण झाली आहे. नव्या वस्तीच्या मोदी  दवाखान्यात फक्त कोविशिल्ड हीच लस दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास वाचविण्यासाठी प्रत्येक केंद्रावर लस कोणती, याविषयी ठळकपणे लिहिले जाणे महत्त्वाचे आहे.  

लसीचा ठणठणाटज्या अधिकारी, कर्मचारी व नागगरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला, त्यांनाच प्राधान्याने दुसरा डोस देणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने महापालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे व ज्यांना २८ दिवस पूर्ण होत आहे त्यांनी बडनेरातील हरिभाऊ वाठ केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी जाण्याची सूचना महापालिका प्रशासनाद्वारा केल्यानंतर गर्दीत भर पडली आहे.

लसींसाठी पुन्हा दोन दिवस प्रतीक्षा

अमरावती : कोरोना आजारावर मात करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन अशा दोन्ही प्रकारच्या लसींचा साठा बुधवारी संपला. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण  भागातील ४० ते ५० टक्के केंद्रांवर दुपारी १२ वाजता लस नव्हती. सोमवारी २५ हजार लसी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महापालिका, खासगी रुग्णालये, ग्रामीण भागात २३, ४५० लसींचे वाटप करण्यात आले होते. बुधवारी बहुतांश केंद्रावर लसींचा ठणठणाट होता. पुन्हा दोन दिवस लसींसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

जिल्ह्यासाठी आरोग्य सहसंचालकांकडे चार लाख लसींची मागणी केली आहे. मात्र, पुणे येथे लस उपलब्ध नसल्याची माहिती वरिष्ठांनी दिली. बुधवारी उशिरा रात्री कळणार आहे.- दिलीप रणमले, डीएचओ

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस