शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कर्ज फेडून वाचवले २८ लाख रुपये, बचत गटाची किमया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 5:57 PM

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : बचतगटातून सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्याची एक अनोखी कहाणी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव येथील महिलांनी साकारली आहे.

चेतन घोगरेअंजनगाव सुर्जी (अमरावती) : बचतगटातून सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्याची एक अनोखी कहाणी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव येथील महिलांनी साकारली आहे. येथील सावित्रीबाई फुले महिला बचतगटाने कर्ज फेडून ११ वर्षांत तब्बल २८ लाखांची बचत केली.सुमारे चार हजार लोकसंख्येचे दहिगाव (रेचा) येथे २००२ साली ४५ ते ५० वर्षे वयोगटातील १४ महिलांनी सावित्रीबाई फुले बचतगट स्थापन केला. दरमहा ५० रुपये याप्रमाणे बचत करणे सुरू केले. दोन वर्षात त्यांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ३० हजारांचे कर्ज मिळाले. यातून शेळ्या खरेदी केल्यानंतर त्यांच्या व्यवस्थापनातून कर्जाची नियमित परतफेड करण्यात आली. सुरुवातीला या महिलांनी शेत केले. मिळालेल्या उत्पन्नातून व कर्ज काढून बचतगटाने २००५ मध्ये चार एकर शेत विकत घेतले.कुटुंबाचा गाडा चालवितानाच हप्ते नियमित भरण्याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळेच प्रत्येक वर्षी एक लाखाचे उत्पन्न त्यांनी मिळवले. आज या बचत गटातील काही महिला वयाच्या सत्तरीत पोहोचल्या आहेत. बचतीचा भाग वाटून घेण्याचे या महिलांनी ठरवले असून, शेत विक्रीला काढले आहे. या शेताचे आजचे बाजारमूल्य २८ लाख रुपये आहे. बचतगटाच्या मालकीच्या शेतीच्या विक्रीसाठीचा परवानगी अर्ज तहसीलदारांकडे पोहोचला आहे.प्रत्येकीला मिळणार दोन लाखदहमहा ५० रुपयांच्या बचतीने सुरू झालेल्या सभासदांना विक्रीनंतर प्रत्येकी दोन लाख रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे, मागील ११ वर्षांत या महिलांनी उत्पादनातूनच लागवडीचा व स्वत:च्या मजुरीचाही खर्च काढला. स्वत: केलेल्या कामाचा मोबदला मिळवून घरखर्चातही मदत केली.या आहेत बचत गटाच्या सदस्यबचत गटाच्या अध्यक्ष दुर्गा मेश्राम, सचिव अनिता कांबळे असून, शोभा गणवीर, सुनील गजभिये, कुसुम कांबळे, महानंदा कांबळे, अन्नपूर्णा मेश्राम, राजकन्या मेश्राम, शांता ढोक, कांता मेश्राम, रत्ना बोरकर, शिटू बोरकर, भागसा शेंडे, गीता कांबळे या महिलांच्या संघटनातून सावित्रीबाई फुले बचतगटाचे कामकाज यशस्वीपणे चालवीत आहेत.दहिगाव येथील सावित्रीबाई फुले गटाचे उत्कृष्ट कामकाज झाले असून, त्यांच्या प्रगतीचे उदाहरण आम्ही इतरांना देत असतो. गटविकास अधिका-यांच्या मार्गदर्शनात प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम केल्या जातात.- श्रीकांत ठाकरे,तालुका समन्वयक, म.रा. ग्रामीण जीवनोन्नती अभियान

टॅग्स :AmravatiअमरावतीWomenमहिला