रॉड, चाकूने हल्ला करून युवकाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 05:00 AM2020-03-12T05:00:00+5:302020-03-12T05:00:05+5:30

मार्डी मार्गावरील अंबिकानगरनजीक रविवारी घडली. अंकुश उर्फ अंकित सदानंद तायडे (२०, रा. वडाळी), असे मृताचे नाव आहे. या घटनेतील अनिकेत देविदास चिंचखेडे (२०, रा. राहुलनगर), अक्षय प्रशांत राठोड (२३, रा. गुरुकृपा कॉलनी), मिखाईल संदीप बन्सोड (१९, रा. जेल कॉर्टरजवळ) या तिघांना फ्रेजरपुरा पोलिसांनी रविवारी अटक केली.

Rod, stabbed to death with a knife | रॉड, चाकूने हल्ला करून युवकाची निर्घृण हत्या

रॉड, चाकूने हल्ला करून युवकाची निर्घृण हत्या

Next
ठळक मुद्देमार्डी मार्गावरील घटना : दोन गटांत हाणामारी, युवक गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धूलिवंदनाच्या दिवशी जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत युवकाची लोखंडी रॉड व चाकूचे १५ वार करून निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या गटातील युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शहरातील खासगी इस्पितळात उपचार सुरू आहे. ही घटना मार्डी मार्गावरील अंबिकानगरनजीक रविवारी घडली. अंकुश उर्फ अंकित सदानंद तायडे (२०, रा. वडाळी), असे मृताचे नाव आहे.
या घटनेतील अनिकेत देविदास चिंचखेडे (२०, रा. राहुलनगर), अक्षय प्रशांत राठोड (२३, रा. गुरुकृपा कॉलनी), मिखाईल संदीप बन्सोड (१९, रा. जेल कॉर्टरजवळ) या तिघांना फ्रेजरपुरा पोलिसांनी रविवारी अटक केली. चौथा आरोपी मनीष प्रकाश बाहेकर याच्यावर दुसºया गटाने केलेल्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झाला. या प्रकरणात इतर चार अनोळखींचाही समावेश असून, एकूण आठ जणांविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत अंकुश तायडे व त्याचे सहा मित्र धूलीवंदनानिमित्त राजुरा येथे मद्य पार्टीसाठी गेले होते. परत येताना घटनास्थळी अक्षय राठोड, मनीष बाहेकर, अनिकेत चिंचखेडे व इतर तीन ते चार अनोळखी इसमाने एकत्रित येऊन दुचाकीने जात असलेले अंकुश तायडे व त्याचा मित्र दीप करवाडे (२०) याला आरोपींनी रस्त्यात अडवून हल्ला चढविला. यामध्ये अंकुशवर लोखंडी रॉडने व चाकूने छातीवर, पोटावर व डोक्यावर वार केले. जीव वाचविण्यासाठी तो रस्त्याने पळत होता. मात्र, आरोपीने त्याचा काही अंतरापर्यंत फिल्मीस्टाईल पाठलाग केला. रक्ताच्या थोरड्यात पडलेल्या अंकुशला त्याचा मित्र दीप व स्थानिक नागरिकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. परंतु त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. फिर्यादी दीप राजेंद्र करवाडे (२०, रा. जिल्हा परिषद कॉर्टरजवळ याच्या तक्रारीवरून आठही आरोपीविरुद्ध भादविंच्या कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हे नोंदविले.
याच भांडणात दुसºया गटाने केलेल्या हल्ल्यात मनीष प्रकाश बाहेकर हा गंभीर जखमी झाला. ही घटना मार्डी मार्गावर दुपारी २.१० वाजता दरम्यान घडली. जखमीचे वडील प्रकाश बापूराव बाहेकर (६३, रा. जलारामनगर प्रभा कॉलनी) यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रेम राजेश सरादे (२२, रा. प्रबुद्धनगर), अक्षय प्रकाश माटे (२५, रा. आशीयाना पोलीस क्लब वीट्टभट्टीनजीक), कुंदन रामकृष्ण बोरकर (२०), सूरज जितेंद्र तायडे (१९, दोन्ही रा. प्रबुद्धनगर वडाळी), दीप राजेंद्र करवाडे (२०, रा. जिल्हा परिषद कॉर्टर), शुभम श्रीधर गडलिंग (२२, रा. बिच्छुटेकडी राहुलनगर), अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भादंवीच्या कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला. यात फिर्यादीचा मुलगा हा मनीष रंगपंचमी खेळण्यास मित्रासोबत गेला असता घटनास्थळी आरोपींनी संगनमताने त्याचेवर हल्ला चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा केला. हत्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन मगर करीत आहेत. याप्रकरणी गुन्ह्यातील तपास एपीआय बिपीन इंगळे करीत आहेत. रंगपंचमीच्या दिवशीत हत्या झाल्याने वडाळी परिसरात खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Rod, stabbed to death with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून