रस्ते फुलले, चैतन्य परतले, अर्थचक्राला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:14+5:302021-06-17T04:10:14+5:30
अमरावती : चार महिन्यांपासून कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेली संचारबंदी बुधवारपासून शिथिल केल्याने बाजारपेठेत चैतन्य परतले आहे. सायंकाळनंतरही रस्ते गर्दीने ...

रस्ते फुलले, चैतन्य परतले, अर्थचक्राला गती
अमरावती : चार महिन्यांपासून कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेली संचारबंदी बुधवारपासून शिथिल केल्याने बाजारपेठेत चैतन्य परतले आहे. सायंकाळनंतरही रस्ते गर्दीने फुलल्यामुळे बाजारपेठेत चहलपहल वाढली. यामुळे जिल्ह्याच्या अर्थचक्राला गती मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झालेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा अनलॉक होण्याची प्रतीक्षा सर्व स्तरात होती. यंदाच्या लग्नसराईचा मुख्य सिझन लॉकडाऊनमध्ये पार बुडाल्याने कापड व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मात्र, आता १२ तासांची मुभा मिळाल्याने या चेहऱ्यांवर आता चैतन्य आले आहे.
मोठे व्यापारीच नव्हे तर लहान दुकानदारांनी जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. दोन महिन्याच्या कठोर निर्बंधानंतर आजचा दिवस हा त्यांच्यासाठी उष:काल ठरला आहे. बिगर जीवनावश्यक दुकानदारांसमोर दुकानाचे भाडे कसे द्यावे, हा प्रश्न निर्माण झाला होता.
सवार्धिक गती कापड उद्योगाला आलेली आहे. विदर्भात पहिल्या क्रमांकावर येथील मार्केट आहे. दुपारनंतर येथे खऱ्या अर्थाने बहर येतो दोन महिन्यापासून व्यवहार बंद, त्याही सुरू झाले तर दुपारी २ च्या आता सर्व बंद करावे लागत होते. आता कालावधी वाढल्याने या व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कोट
वीज बिलात सूट द्यावी
जिल्हा अनलॉक केल्याबाबत प्रशासनाचे आभार, चार महिन्यांपासून व्यवहार ठप्प आहे. त्यामुळे व्यावासयिकांचे वीजबिल थकलेले आहेत. यात काही प्रमाणात सूट मिळण्याची मागणी आम्ही करीत आहोत.
- पप्पू गगलानी,
सचिव, तखतमल मार्केट असो.
कोट
सीझन संपल्यावर नव्याने सुरुवात
कोरोनाकाळात शासन, प्रशासनाने उल्लेखनीय कार्य केले. यंदाचा हंगाम संपल्यावर आता व्यवसायाची सुरुवात होत आहे. नुकसान झालेलेेच आहे. मात्र, कोरोना नियमांचे पालन करू.
- किशन कोटवानी,
सिटीलॅन्ड सोशल फोरम
कोट
१४ पैकी ६ महिने व्यवसाय बंद
कोरोनाकाळात १४ पैकी सहा महिने व्यवसाय बंद राहिला. दोन्ही वर्षे महत्त्वाच्या वेळी दुकाने बंद ठेवावे लागल्याने मोठे नुकसान झाले. आता नव्या जोमाने व्यवसाय करू.
- विजय भुतडा,
अध्यक्ष, बिझिलॅन्ड असोसीएशन