सातेफळ गावात रस्त्याचे झाले पांदण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:01 IST2020-08-19T05:00:00+5:302020-08-19T05:01:03+5:30
सातेफळ स्टँडपासून ते गावातील पाण्याच्या टाकीपर्यंतचा मुख्य रस्ता अतिशय खराब झाला असून, चिखलामुळे या रस्त्यावरून वाहनाने नव्हे, पायी जाणेही कठीण झाले आहे. या गावातील इतरही रस्त्यांची स्थिती बिकट आहे. एकीकडे पांदण रस्ते चांगल्या प्रकारे तयार होत असताना दुसरीकडे गावातीलच मुख्य रस्त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

सातेफळ गावात रस्त्याचे झाले पांदण
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : तालुक्यात बऱ्यापैकी पांदण रस्ते तयार झाले असून, यामुळे शेतकऱ्यांना आता शेतात जाणे सोईचे झाले आहे. याउलट गावातील रस्ते पांदणसदृश झाले आहेत. सातेफळ गावातील मुख्य रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ गावातील अंतर्गत रस्त्याची ऐन पावसाळ्यात वाट लागली आहे. सातेफळ स्टँडपासून ते गावातील पाण्याच्या टाकीपर्यंतचा मुख्य रस्ता अतिशय खराब झाला असून, चिखलामुळे या रस्त्यावरून वाहनाने नव्हे, पायी जाणेही कठीण झाले आहे. या गावातील इतरही रस्त्यांची स्थिती बिकट आहे. एकीकडे पांदण रस्ते चांगल्या प्रकारे तयार होत असताना दुसरीकडे गावातीलच मुख्य रस्त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
तीन वर्षांपासून प्रशासनाकडे मागणी
गावातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तीन वर्षांपासून प्रशासनाकडे निवेदन दिले. मात्र, अजूनही रस्त्याचे काम झालेले नाही. प्रशासनाने या रस्त्याचे बांधकाम त्वरित करावे, अशी मागणी ग्रामस्थ देवानंद कदम यांनी केली.
म्हातारे, वाहनचालकांना त्रास
गावातील या मुख्य रस्त्याची अशी गंभीर परिस्थिती झाली असताना, आम्ही लोकप्रतिनिधींकडे याबाबतची निवेदने दिली. परंतु, त्यावर अजूनही काही झालेले नाही. या रस्त्याचा गावातील वृद्ध नागरिक, वाहनचालकांना त्रास होत आहे. जुन्या जाणत्या ग्रामस्थांनी विकासाकडे वाटचाल पाहिली. आता ही वाटचाल उलट्या दिशेने सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
गावातील या मुख्य रस्त्याची अशी गंभीर परिस्थिती झाली असतांना आम्ही लोकप्रतिनीधींकडे याबाबतचे निवेदने दिली. परंतु, त्यावर अजूनही काही कार्यवाही झालेली नाही. या रस्त्याचा गावातील वृद्ध नागरिक, वाहनचालकांना त्रास होत असला तरी याकडे लक्ष द्यावे, असे मनीष मोहोड यांनी म्हटले.