हैदतपूर ते आसेगाव रस्ता जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:01 IST2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:01:06+5:30
तालुक्यातील आसेगाव, फुबगाव- हैदतपूर मार्गाचे नुकतेच काम करण्यात आले. मात्र , निकृष्ट काम झाल्याने अवघ्या सहा महिन्यांत संपूर्ण रस्ता उखडला आहे. यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्ताची इतकी दुर्दशा झाली की, रस्त्याच्या वरच्या थरावरील डांबरीकरण निघून गेले.

हैदतपूर ते आसेगाव रस्ता जीवघेणा
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यातील आसेगाव, फुबगाव- हैदतपूर मार्गाचे नुकतेच काम करण्यात आले. मात्र , निकृष्ट काम झाल्याने अवघ्या सहा महिन्यांत संपूर्ण रस्ता उखडला आहे. यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्ताची इतकी दुर्दशा झाली की, रस्त्याच्या वरच्या थरावरील डांबरीकरण निघून गेले.
काही भागात तर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे या रस्तावरून धावणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा तर नसावी ना, अशा तिखट प्रतिकिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे लक्ष घालून काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
हैदतपूर ते फुबगाव हा आसेगावला जाणारा रस्ता पूर्णत: निकृष्ट कामामुळे उखडला आहे. या रस्त्यावरून स्कूल बस व मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. वाढते अपघात पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ताचे काम त्वरित मार्गी लावावे, अशी अपेक्षा फुबगाव येथील योगेश किटुकले यांनी व्यक्त केली.