सुपर स्प्रेडर व्यक्तींमुळे संसर्गाचा धोका; जानेवारी पश्चात दुसरी लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 09:39 PM2020-11-15T21:39:49+5:302020-11-15T21:40:13+5:30

Amravati News Corona व्यवसायानिमित्ताने ज्या व्यक्तींचा अधिक जनसंपर्क किंवा सामाजिक संपर्क आहे, अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे राज्याच्या आरोग्य संचालकांनी ११ नोव्हेंबरच्या पत्रान्वये स्पष्ट केले आहे.

Risk of infection by super spreader individuals; The second wave after January | सुपर स्प्रेडर व्यक्तींमुळे संसर्गाचा धोका; जानेवारी पश्चात दुसरी लाट

सुपर स्प्रेडर व्यक्तींमुळे संसर्गाचा धोका; जानेवारी पश्चात दुसरी लाट

Next
ठळक मुद्देआरोग्य संचालकांचा जिल्हा व महापालिका प्रशासनाला अलर्ट

गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सप्टेंबरनंतर कोरोना संसर्गाचा पॉझ आलेला आहे. सध्या सुरू असलेले सण, उत्सव व निवडणुकीनंतर जानेवारी पश्चात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. यात व्यवसायानिमित्ताने ज्या व्यक्तींचा अधिक जनसंपर्क किंवा सामाजिक संपर्क आहे, अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे राज्याच्या आरोग्य संचालकांनी ११ नोव्हेंबरच्या पत्रान्वये स्पष्ट केले आहे. याबाबत अलर्ट राहण्याच्या सूचना जिल्हा व महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

कोरोना उद्रेकाच्या सध्या उतरणीच्या काळातही चाचण्या सक्षमपणे करण्यात याव्यात. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनानुसार दरदिवशी १० लाख लोकसंख्येमागे किमान १४० चाचण्या करण्यात याव्यात. नागरिकांना सतर्कतेचा इशारा मिळावा, यासाठी फ्ल्यूसारख्या आजाराचे जिल्हाभरात सर्वेक्षण करण्यात यावे. एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमातून ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये यांच्याकडूण ईंन्फूएंझासदृष्य रुग्णांच्या आठवडी अहवालाचे अवलोकन करून सामाजिक ट्रेंड समजावून घेणे महत्त्वाचे आहे व अधिक उद्रेक असणाºया ठिकाणी प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण वाढवावे व गृहभेटीद्वारे सर्वेक्षण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक वेगाने करण्याचे आरोग्य संचालकांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी क्षेत्रीय पातळीवर उपकेंद्र, वॉर्डनिहाय पथके कार्यरत करणे व पथकांद्वारा घरगुती विलगीकरणातील व्यक्तींवर मॉनिटरींग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व त्यांच्या चाचण्या याशिवाय फ्लूसारख्या आजाराचे नियमित सर्वेक्षण व हॉटस्पॉट भागाकडे विशेष लक्ष देण्याचे नियोजन करण्याचे जिल्हा व महापालिका यंत्रणेला निर्देश आहेत.

या सुपर स्प्रेडर व्यक्तींचे विशेष सर्वेक्षण
छोटे व्यावसायिक : किराणा दुकानदार, भाजीवाले, हॉकर्स, हॉटेल मालक व वेटर्स

घरगुती सेवा पुरविणारे : घरगुती काम करणाºया मोलकरणी, नळजोडणी, दुरुस्ती लॉन्ड्री, पुरोहित
वाहतूक व्यवसायातील लोक : मालवाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पोचालक, रिक्षाचालक

वेगवेगळी कामे करणारे मजूर : हमाली, रंगकाम, बांधकाम करणारे मजूर
सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतील ड्रायव्हर कंडक्टर, सुरक्षारक्षक, पोलीस, होमगार्ड

चाचण्यांमधील पॉझिटिव्हीटीनुसार रुग्णालय व्यवस्था
कोरोनाच्या संभाव्य दुसºया लाटेत चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी ७ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास ५ ते ७ समर्पित कोरोना रुग्णालये ठेवावीत. ७ ते १० टक्के असल्यास मेडिकल कॉलेजसह शहरी प्रभाग व तालुकास्तरावर एक रुग्णालय. ११ ते १५ असल्यास आवश्यकतेनुसार २० टक्के कोविड रुग्णालये कार्यान्वित ठेवावी, १६ ते २० असल्यास मल्टिस्पेशालिटी व्यवस्थापनाची सोय असणारी सर्व रुग्णालये कोविड रुग्णांसाठी कार्यान्वित ठेवावी, तसेच २० टक्क्यांवर असल्यास यापूर्वीच सर्व कॅटेगिरीतील १ ते ३ रुग्णालये कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश आहेत.

१५ दिवसांचा औषधींचा बफर स्टॉक
जिल्हा व महापालिका रुग्णालयांनी ज्या काळात कोरोना संसर्ग सर्वाधिक होता. त्यावेळी लागलेली औषधी व साधनसामग्रीची गरज लक्षात घेवून त्याचे किमान ५० टक्के औषधी नेहमी उपलब्ध राहतील दक्षता घ्यावी व किमान १५ दिवसांचा बफर स्टॉक नियमित ठेवण्याचे निर्देश आहेत.

को-मॉर्बिडीटी क्लिनिक अन् हायरिस्कचे रुग्ण
ज्यांचे वय ६० वर आहेत व त्यांना अतिजोखमीचे आजार आहेत अशांना नियमित उपचारा व ते नियंत्रित ठेवण्यासाठी समुहाला मार्गदर्शन व को-मॉर्बिडीटी क्लिनिक सुरू ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहेत. यापूर्वीच्या सर्वेक्षणात नोंद झालेली अतिजोखमीच्या व्यक्तींची यादी आरोग्य कर्मचाऱ्यांना देऊन साप्ताहिक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

Web Title: Risk of infection by super spreader individuals; The second wave after January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.