रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट; पळवापळवीने प्रवाशांना वैताग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:13 IST2021-09-22T04:13:56+5:302021-09-22T04:13:56+5:30
पान ३ वर लिड असाईनमेंट अमरावती : शहरातील मुख्य रस्त्यावर रिक्षाचालक बेदरकारपणे रिक्षा चालवतात. वाहतूक नियम पाळत नाहीत. ...

रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट; पळवापळवीने प्रवाशांना वैताग !
पान ३ वर लिड
असाईनमेंट
अमरावती : शहरातील मुख्य रस्त्यावर रिक्षाचालक बेदरकारपणे रिक्षा चालवतात. वाहतूक नियम पाळत नाहीत. ओव्हरसिट प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे. यावर नियंत्रण कधी येणार, असा प्रश्न आहे. वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त अनिल कुरळकर यांनी वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोेजना राबविण्यास सुरुवात केली असली तरी ऑटोचालकांच्या पळवापळवीवर नियंत्रण गरजेचे आहे. रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट ही बाब नित्याचीच झाली आहे.
ऑटो रिक्षांमध्ये मुख्यत: तीन प्रवासी घेण्याची मुभा असताना आठ-दहा प्रवासी वाहतूक होते. काही रिक्षाचालकांनी पाठीमागील बाजूस जाळी लावली आहे. त्यातूनही प्रवासी वाहतूक सुरूच असते. काहीजण साऊंड सिस्टिम बाॅक्सवर प्रवासी बसवितात. चौकात चालक सीटवर दोन-तीन प्रवासी बसवून घेतात. वाहतूक पोलीस दिसले की, काही प्रवाशांना उतरवून दिले जाते. पुन्हा परिस्थिती जैसे थे होते.
////////////
या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी
बसस्थानक
येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोर, सायकल स्टॅन्डसमोर ऑटो लावले जातात; मात्र येथे वाहतूक पोलीस हजर असतानाही काहींची मनमानी सुरू असते. वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून तीनपेक्षा अधिक प्रवासी भरले जातात. सात-आठ प्रवासी घेतल्याशिवाय ऑटो सुरूदेखील केली जात नाही.
///////////
रेल्वेस्थानक
अमरावती रेल्वेस्थानकावर सकाळी व सायंकाळी ऑटोचालकांची मोठी संख्या असते. ती सर्व वाहने रेल्वे स्थानकाच्या आतील प्रवेशद्वारासमोर, खेटून उभी केली जातात. या भागातून प्रवाशांची सर्वाधिक पळवापळवी चालते.
////////////
बडनेरा रेल्वेस्थानक
बडनेरा जंक्शनच्या बाहेर पडलो की, चलो अमरावतीचा सूर कानावर आदळतो. येथे अनेकदा ऑटोचालक व प्रवाशांमध्ये वाद झडत असतो. अनेकदा ते वाद आणि प्रवाशांच्या पळवापळवीच्या घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्या आहेत.
////////////
प्रवाशांना त्रास
अमरावती बसस्थानकाशेजारी ऑटोसाठी थांबलात की, अनेक ऑटोचालक विचारणा करतात. त्यांच्यातही क्रमांक असतो, हे ऐकिवात आहे. प्रत्येकजण आओ, या म्हणतात. मात्र, सात-आठ प्रवासी झाल्याशिवाय ऑटो जागचा हलतदेखील नाही.
नरेंद्र कडू, प्रवासी
//////////
एकदा राजापेठमार्गे अकोली जात असताना स्पेशल ऑटो ठरविला. २०० रुपये भाडेदेखील दिले. मात्र, ऑटोचालकाने मध्यंतरीच्या प्रवासात राजकमल, राजापेठ व साईनगर भागातून प्रवासी घेतले. पैसे पूर्णच घेतले. कुणाकडे तक्रार करायची?
- सुधीर तायडे, प्रवासी
////////////
मनमानी भाडे
१) शहरात अनेक ठिकाणी वेळेनुसार वेगवेगळी भाडे आकारणी केली जाते.
२) रात्रीच्या वेळी मनमानी भाडे आकारले जाते.
३) ऑटोचालकनिहाय दर बदलले असतात. त्याचा मोठा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो.
४) अमरावती रेल्वे स्थानकावर सकाळी वेगवेेगळे ऑटोचालक मनमानी भाडे सांगतात.
५) नकार दिल्यास ‘पहिली बार जा रहे क्या’ असा टोमणा बऱ्याचदा मारला जातो.
/////////////
तर ऑटोचालकांवर कारवाई....
ऑटोचालकांसाठी निश्चित असे वाहतूक नियम आहेत. कायद्याचे पालन न केल्यास संबंधितांवर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. शहरातील वाहतूक व्यवस्था ‘नीट ॲन्ड क्लीन’ करण्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोतच. बेशिस्त ऑटोचालकांना समज दिली जाईल.
- अनिल कुरळकर, प्रभारी सहायक आयुक्त
वाहतूक शाखा
////////////