तिवसा तहसीलवर क्रांतीदिनी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:16 IST2021-08-12T04:16:47+5:302021-08-12T04:16:47+5:30
शेतकरीविरोधी तीन काळे विधेयक मागे घ्या. आशा वर्कर, शालेय पोषण कामगारांना १८ हजार रुपये मानधन द्या. महागाई कमी करा. ...

तिवसा तहसीलवर क्रांतीदिनी निदर्शने
शेतकरीविरोधी तीन काळे विधेयक मागे घ्या. आशा वर्कर, शालेय पोषण कामगारांना १८ हजार रुपये मानधन द्या. महागाई कमी करा. मोदी सरकार राजीनामा द्या आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार फरताडे यांना प्रतिनिधी मंडळाने दिले. अखिल भारतीय शेतमजूर युनियन लालबावटा, अखिल भारतीय किसान सभा व सिटू कामगार संघटना या तीन संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्व शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप शापामोहन, किसान सभेचे जिल्हा सचिव महादेव गारपवार यांनी केले. त्यांनी नगरपंचायतीतील भ्रष्टाचाराचेसुद्धा वाभाडे काढले. आंदोलनात सदाशिव विघ्ने, अंकुश वाघ, बेबी सुरजुसे, गुंफा गेडाम, सुरेश मोरघडे, माला जिरापुरे, अरुणा तागडे, धनराज चतुर्भुज, छाया होले, सुभाष खांडेकर, प्रफुल्ल निकाळजे, रामगोपाल निमावत, प्रतिभा मकेश्वर, सिंधू राठोड आदी आंदोलनात सहभागी झाले होते. ‘मोदी सरकार चले जाव’च्या घोषणेने आंदोलनाची सांगता झाली.