अपर पोलीस महासंचालकांकडून एसीबीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:06 IST2017-11-23T23:06:39+5:302017-11-23T23:06:49+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक बी.के. सिंग यांनी गुरुवारी एसीबी कार्यालयाचा आढावा घेऊन बैठक बोलाविली, .....

Review of ACB from Additional Director General | अपर पोलीस महासंचालकांकडून एसीबीचा आढावा

अपर पोलीस महासंचालकांकडून एसीबीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक बी.के. सिंग यांनी गुरुवारी एसीबी कार्यालयाचा आढावा घेऊन बैठक बोलाविली, शिवाय त्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांचा हा नियमित आढावा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
अपर पोलीस महासंचालकांनी एसीबी कार्यालयातील बैठकीत कामकाजाची स्थिती जाणून घेतली व अधिकारी व कर्मचाºयांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त मंडलिक यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी तत्कालीन पोलीस आयुक्त जगन नाथ यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Review of ACB from Additional Director General