अवैध रेती पकडण्यासाठी महसूल विभागाची पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:11+5:30

आ. देवेंद्र भुयार यांनी दोन्ही राज्यांच्या प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून जलसंधारण आणि थांबलेले काम सुरू करण्याकरिता मध्य प्रदेशातून रेती वाहतूक आणि स्टोन क्रशरवरून गिट्टी मिळावी, याकरिता प्रयत्न केले. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारने १९ टिप्परला सौंसर (मध्यप्रदेश) घाटातून रेती वाहतुकीला परवानगी दिली. परंतु, काही दिवस परवानगीप्राप्त वाहने चालल्यानंतर रेती तस्करांनी शेकडो टिप्पर रेतीची वाहतूक विनापरवानगी चालविली आहे.

Revenue department squads to catch illegal sand | अवैध रेती पकडण्यासाठी महसूल विभागाची पथके

अवैध रेती पकडण्यासाठी महसूल विभागाची पथके

Next
ठळक मुद्देआमदारही आक्रमक : तहसीलदार म्हणाले, वाहतुकीवर कारवाई करू

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : महाराष्ट्र व मध्य प्रदेश शासनाच्या परवानगीआड तालुक्यात रेती तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. लॉकडाऊनचा गैरफायदा उठवत हा गोरखधंदा दिवसाढवळ्या सुरू आहे. महसूल व पोलीस यंत्रणा लॉकडाऊन व संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात गर्क असल्यामुळे त्यात भर पडली आहे. अवैध रेतीची ही वाहतूक थांबविण्यासाठी तहसील स्तरावर पथके गठित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुनील सावंत यांनी दिली. याप्रकरणी आमदारही आक्रमक झाले. तहसील यंत्रणा कारवाई करीत नसेल, तर आपण रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला.
लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे वरूड मोर्शी तालुक्यात शासकीय बांधकामे रखडली आहेत. त्याअनुषंगाने आ. देवेंद्र भुयार यांनी दोन्ही राज्यांच्या प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून जलसंधारण आणि थांबलेले काम सुरू करण्याकरिता मध्य प्रदेशातून रेती वाहतूक आणि स्टोन क्रशरवरून गिट्टी मिळावी, याकरिता प्रयत्न केले. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारने १९ टिप्परला सौंसर (मध्यप्रदेश) घाटातून रेती वाहतुकीला परवानगी दिली. परंतु, काही दिवस परवानगीप्राप्त वाहने चालल्यानंतर रेती तस्करांनी शेकडो टिप्पर रेतीची वाहतूक विनापरवानगी चालविली आहे. अमरावती, अकोलापर्यंत ही रेती नेली जात आहे. २८ एप्रिल रोजी अमरावती आणि छिंदवाडा जिल्हाधिकाऱ्यांनी सहा कंत्राटदारांच्या १९ टिप्पर ट्रकला परवानगी दिली. या परवानगीवरून दोन-तीन दिवस अधिकृत परवानाप्राप्त वाहनांनी रेतीची वाहतूक झाली. मात्र त्यानंतर लॉकडाऊनचा गैरफायदा घेत शेकडो टिप्पर रस्त्यावर उतरले.

जलसंधारण आणि शासकीय कामांकरिता रेती वाहतुकीची परवानगी दिलेली वाहने वगळता अनधिकृत रेती वाहतूक करणाºया वाहनाचा शोध घेऊन कारवाई करू. याकरिता पथके नेमली आहेत.
- सुनील सावंत, तहसीलदार

रेती तस्करी सुरूच आहे. प्रशासन हातावर हात धरून बसल्यास स्वत: कारकर्त्यांसह टिप्पर पकडून पोलिसांच्या ताब्यात देईन व याबाबत राज्य शासनाकडे तक्रार करेन.
- देवेंद्र भुयार
आमदार, मोर्शी

Web Title: Revenue department squads to catch illegal sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू