महसूल विभागावर जनतेचा रोष कायमच!
By Admin | Updated: August 28, 2015 00:43 IST2015-08-28T00:43:37+5:302015-08-28T00:43:37+5:30
महसूल विभागातील काही जबाबदार अधिकाऱ्यांची मेहर नजर असल्याने रेती तस्करी फोफावली होती.

महसूल विभागावर जनतेचा रोष कायमच!
अधिकाऱ्यांची मेहर नजर : रेती तस्करीतून अनेक जण कोट्यधीश
अमरावती/अचलपूर : महसूल विभागातील काही जबाबदार अधिकाऱ्यांची मेहर नजर असल्याने रेती तस्करी फोफावली होती. स्वत:चे खिसे गरम करण्यासाठी काही अधिकारी रेती तस्करीला मदत करीत होते, हे उघड आहे. महसूल विभागाकडे मोहन बटाउवाले यांनी तक्रारी केल्यानंतरही केवळ कागदीघोडे नाचविण्यात आले. त्यामुळे महसूल विभागावर जनतेचा रोष कायम आहे.
आपल्या शेतातून रेती तस्कर ट्रॅक्टर नेत असल्याने उभ्या पिकाची नासाडी होत होती. त्यामुळे मोहन बटाउवाले यांनी महसूल विभागातील तहसीलदार, मंडल अधिकारी यांच्या भेटी घेऊन व फोनद्वारे कित्येकदा माहिती देऊनही तात्पूरती कारवाई केली जात असल्याने शेवटी २८ नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. संबंधित अधिकारी अवैध उत्खननाकडे व वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी रेती चोरट्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. पण, रेती तस्करांच्या कायमस्वरुपी मुसक्या आवळल्या जात नसल्याने मोहन बटाउवाले यांनी ४ जुलै २०१५ ला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे निवेदन पाठवून वाळू तस्करीची माहिती दिली होती. त्यात वाळू तस्करी मध्यरात्रीनंतर होते, असे नमूद करण्यात आले होते. तसेच आपण एक दिवस मध्यरात्री तहसीलदारांना वाळू तस्करीची माहिती फोनवरुन दिली असता मला रात्री १० वाजेपर्यंत फोन करायचा, असे त्यांनी बजावल्याचा उल्लेख निवेदनात नमूद करण्यात आला होता. (प्रतिनिधी)अमरावती/अचलपूर : महसूल विभागातील काही जबाबदार अधिकाऱ्यांची मेहर नजर असल्याने रेती तस्करी फोफावली होती. स्वत:चे खिसे गरम करण्यासाठी काही अधिकारी रेती तस्करीला मदत करीत होते, हे उघड आहे. महसूल विभागाकडे मोहन बटाउवाले यांनी तक्रारी केल्यानंतरही केवळ कागदीघोडे नाचविण्यात आले. त्यामुळे महसूल विभागावर जनतेचा रोष कायम आहे.
आपल्या शेतातून रेती तस्कर ट्रॅक्टर नेत असल्याने उभ्या पिकाची नासाडी होत होती. त्यामुळे मोहन बटाउवाले यांनी महसूल विभागातील तहसीलदार, मंडल अधिकारी यांच्या भेटी घेऊन व फोनद्वारे कित्येकदा माहिती देऊनही तात्पूरती कारवाई केली जात असल्याने शेवटी २८ नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. संबंधित अधिकारी अवैध उत्खननाकडे व वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी रेती चोरट्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. पण, रेती तस्करांच्या कायमस्वरुपी मुसक्या आवळल्या जात नसल्याने मोहन बटाउवाले यांनी ४ जुलै २०१५ ला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे निवेदन पाठवून वाळू तस्करीची माहिती दिली होती. त्यात वाळू तस्करी मध्यरात्रीनंतर होते, असे नमूद करण्यात आले होते. तसेच आपण एक दिवस मध्यरात्री तहसीलदारांना वाळू तस्करीची माहिती फोनवरुन दिली असता मला रात्री १० वाजेपर्यंत फोन करायचा, असे त्यांनी बजावल्याचा उल्लेख निवेदनात नमूद करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
सोशल मीडियावर ‘लोकमत’चे अभिनंदन
रेती तस्कर व बारुद गँगची गुंडागर्दी याबद्दल 'लोकमत'मध्ये निर्भीडपणे बातम्या प्रसिध्द करण्यात आल्याने 'व्हॉट्स अॅप'वर 'लोकमत'च्या अभिनंदनाचे 'मेसेज' टाकले जात आहेत. तसेच लोकमत घेण्यासाठी लोकांच्या उड्या पडत असून सकाळी १० वाजेनंतर स्टॉलवरही लोकमतचा अंक मिळेणासा झाला आहे. 'लोकमत'ने रेती तस्कर कोणत्या लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते आहेत. तहसीलदार राठोड यांची बदली का झाली, हे चव्हाट्यावर आणून बारुद गँग व त्यांना सहकार्य करणाऱ्या काही अधिकाऱ्यांना उघडे पाडल्याबद्दल अचलपूर विकास संघर्ष समितिचे अध्यक्ष अमोल सुरटकर, प्रा. रवींद्र तोडगावकर, श्याम क्षीरसागर, नगरसेवक पवन बुंदेले, मंदाताई भारती, किशोर कासार, राजा पिंजरकर, प्रीतेश अवघड, विवेक महल्ले, भूषण नागे, अभय जोशी, नगरसेवक संजय भोंड, मनीष अग्रवाल, संदीप देंडव, गजानन रोडगे, माजी नगरसेवक राजू बघिले, सुधीर तारे, लक्ष्मण खैरे, नितीन घाटेवार यांच्यासह आदींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. विविध क्षेत्रांतील गणमान्यांच्या अभिनंदनाचे शेकडो फोन 'लोकमत'ला येत आहेत.
अमितच्या कुटुंबाच्या संरक्षणाची
मागणी करण्यात आली होती
वाळू तस्करांना मंडल अधिकारी आणि महसूल विभागातील काही अधिकारीच प्रोत्साहन देत आहेत. वाळू तस्करांपासून माझे पती मोहन व कुटुंबातील सदस्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी आम्हाला संरक्षण देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन हत्या मृत अमितची आई अनिता बाटउवाले यांनी महसूलमंत्र्यांना पाठविले होते.
पाठविलेल्या निवेदनापैकी एकाही अर्जाची दखल संबंधितांनी घेतली असती तर कदाचित अमितचा जीव वाचला असता व त्याचे वडीलही अपंग होण्यापासून बचावले असते.
मोक्काची मागणी
अचलपूर येथे घडलेल्या अमानूष हत्याकांडातील आरोपींवर ‘मोक्का ’ अंतर्गत कारवाई करून महसूल विभागातील जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचा 'मेसेज' स्वराज्य शिवगर्जना ग्रुपवर टाकण्यात आलेला आहे.