लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जबलपूर - अमरावती एक्स्प्रेस येथील मॉडेल रेल्वे स्थानकावर आली असताना पोलिसांच्या तपासणीअंती एका डब्यात काळ्या रंगाची बॅग आढळली. ही बॅग नेमकी कुणाची, ही चौकशी करून त्यानंतर रेल्वेपोलिसांनी शोध घेतला आणि ती बॅग प्रवाशाला सुखरूप परत केली. शुभम शामकांत औगड (रा. पोटे टाऊनशिप, अमरावती) असे त्या प्रवाशाचे नाव आहे.रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास जबलपूर - अमरावती एक्स्प्रेस ही गाडी प्लॅटफार्म क्रमांकावर १ वर आली होती. गाडीतून प्रवासी बाहेर पडल्यानंतर रेल्वे पोलीस नियमितपणे रिकाम्या डब्यांची पाहणी करतात. दरम्यान कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक रंगारी आणि जमादार मदन वानखडे यांना एका डब्यात काऴ्या रंगाची बॅग दिसून आली. ही बॅग ताब्यात घेऊन पंचनामा केला असता यात नामांकित कंपनीचे लॅपटॉप व अन्य साहित्य आढळून आले. कालांतराने शुभम औगड हे वडिलांसोबत रेल्वे पोलीस चौकीत आले असता जबलपूर एक्स्प्रेसमध्ये बॅग हरविल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी खातरजमा करून ही बॅग परत केली. लॅपटॉपसह बॅग परत मिळाल्याचा आनंद औगड यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. रेल्वे पोलिसांनी दर्शविलेल्या सौजन्याने त्यांनी आभारदेखील मानले.
जबलपूर एक्स्प्रेसमध्ये हरविलेली बॅग दिली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST
रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास जबलपूर - अमरावती एक्स्प्रेस ही गाडी प्लॅटफार्म क्रमांकावर १ वर आली होती. गाडीतून प्रवासी बाहेर पडल्यानंतर रेल्वे पोलीस नियमितपणे रिकाम्या डब्यांची पाहणी करतात. दरम्यान कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक रंगारी आणि जमादार मदन वानखडे यांना एका डब्यात काऴ्या रंगाची बॅग दिसून आली.
जबलपूर एक्स्प्रेसमध्ये हरविलेली बॅग दिली परत
ठळक मुद्देपोलिसांचे कर्तव्य : प्रवाशाला मिळाला लॅपटॉप