कुटुंब नियोजनात जिल्हा माघारला
By Admin | Updated: January 7, 2016 00:20 IST2016-01-07T00:20:58+5:302016-01-07T00:20:58+5:30
कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत यंदा जिल्हा माघारणार असून उद्दिष्टापेक्षा केवळ सहा टक्के शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

कुटुंब नियोजनात जिल्हा माघारला
११ महिन्यांत साडेतीन हजार शस्त्रक्रिया : उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड
मोहन राऊ त अमरावती
कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत यंदा जिल्हा माघारणार असून उद्दिष्टापेक्षा केवळ सहा टक्के शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. १४ तालुक्यात १० हजार ६९५ पैकी ३ हजार ४११ जणांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत़
जिल्ह्यात यंदा १० हजार ६९५ असे उद्दिष्ट १४ तालुक्याला दिले आहे़ आतापर्यंत केवळ ३ हजार ४११ शस्त्रक्रिया झाल्या आहेत़ यात ३१४ पुरूषांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. तिवसा तालुक्यात २८२ जणांनी नसबंदी केली तर दर्यापूर तालुक्यात ८११ उद्दिष्टांपैकी ४०२ जण नसबंदी शस्त्रक्रियेला सामारे गेले आहेत. वरूड तालुक्यात ९८१ पैकी ४५१ अमरावती ६४३ पैकी २६६, अचलपूर तालुक्यात १ हजार ३८४ पैकी ५५५, धामणगाव रेल्वे ६३६ पैकी २३५, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ६१५ पैकी २२० चांदूररेल्वे ४४९ पैकी १२९, मोर्शी ८८० पैकी १९८, भातकुलीत केवळ ५९ जणांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली, धारणी तालुक्यात ९२० पैकी ३७ जणांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या. ३७ शस्त्रक्रिया केंद्रात अनुभवी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शस्त्रक्रियेचे उदिष्ट पूर्ण होणे शक्य नसल्याची माहिती आरोग्यविभागाकडून आली आहे़
कुटुंब नियोजनाबाबत शासनाकडून योग्य ती जनजागृती केली जाते. मात्र, त्या तुलनेत उद्दिष्ट्यपूर्ती झाली नसल्याचे चित्र आहे. जिल्हा माघारल्याचे एकूण चित्र यामध्ये दिसून येत आहे.
अचलपूर तालुका अव्वल
कुटुंब नियोजन शस्त्रक्रि येत जिल्ह्यातील १४ तालुक्यात अचलपूर तालुक्याचा क्रमांक पहिला लागतो तर दुसरा क्रमांक अंजनगाव सुर्जी, वरूड दर्यापूर, तिवसा, धामणगाव, तालुक्याचा आहे़ जिल्हा परिषदेचा आरोग्यविभागही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया धडक मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढे सरसावला आहे.
पुरूषांच्या शस्त्रक्रियेची सोपी पध्दत
पुरूष नसबंदीसाठी आरोग्य विभागाने प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे़ पुरूष शस्त्रक्रिया अतिशय सोपी आणि सुटसुटीत असेते़ महिलांवर शस्त्रक्रिया केल्यास किमान सात दिवस रूग्णालयात राहावे लागते़ तसेच शस्त्रक्रियेनंतर अन्य शारीरिक व्याधी सुरू होण्याचा धोकाही असतो़ पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया १५ मिनिटांत होते़ अर्ध्या तासात संबंधित रूग्ण घरी जाऊ शकतो़ त्यामुळे पुरूषाला कोणताही त्रास जाणवत नाही़ नसबंदी केल्यास शासनाकडून १५०० रूपयांचे अनुदान मिळते, हे जरी खरे असले तरी आजही याबाबत अनेक दंतकथा प्रसिध्द आहेत. त्यामुळेच महिलांवरच या शस्त्रक्रिया करतात़ एका वर्षात केवळ ३१४ पुरूषांनी नसबंदी केली आहे
महिलांचा दृष्टिक ोण बदलने महत्त्वाचे
बाळंतपण झाल्यानंतर काही महिला कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी तयार होतात़ किंबहुना पुरूषांची नसबंदी म्हणजे अघटित घडते, असा समज अद्यापही अनेक ठिकाणी रूढ आहे़ त्यामुळे रूग्णालयात दाखल महिलांसमोर डॉक्टरांनी पुरूष नसबंदीचा प्रस्ताव ठेवला तर महिलाच त्याला नकार देतात, असे चित्र आहे.
प्रबोधन मिळणार कधी?
ज्यावेळी एखादी महिला शस्त्रक्रियेसाठी दाखल होते तेव्हा संबंधित दाम्पत्याचे प्रबोधन होऊन त्यांच्यासमोर विकल्प ठेवले पाहिजेत़ संतती नियमन अथवा पुरूष नसबंदी असे विकल्प दिल्यास महिलांना शस्त्रक्रियेचा त्रास होणार नाही़ पुरूष शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढण्यासाठी आता मतपरिवर्तन करणे ही काळाची गरज बनली आहे़