देशसेवेसाठी सेवानिवृत्त सैनिक धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:01 IST2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:01:27+5:30

तालुक्यातील १५ माजी सैनिकांसोबतच सुट्टीवर आलेले तीन सैनिक रोज सकाळी अंजनगाव शहरांमध्ये पोलिसांनी लावलेल्या वेगवेगळ्या पॉइंंटवर नि:स्वार्थपणे कुठलाही मोबदला न घेता सेवा देत आहेत. संचारबंदीच्या काळात हे सेवानिवृत्त सैनिक पोलिसांसोबत खंबीरपणे उभे आहेत.

Retired soldiers ran for country service | देशसेवेसाठी सेवानिवृत्त सैनिक धावले

देशसेवेसाठी सेवानिवृत्त सैनिक धावले

ठळक मुद्देबांधिलकी : कोरोना प्रतिबंधाबाबत जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : देशावर कोरोनाच्या रुपात राष्ट्रीय संकट ओढवले आहे. त्या संकटावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा राबत असताना येथील माजी सैनिकही सरसावले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी जागर चालविला आहे.
तालुक्यातील १५ माजी सैनिकांसोबतच सुट्टीवर आलेले तीन सैनिक रोज सकाळी अंजनगाव शहरांमध्ये पोलिसांनी लावलेल्या वेगवेगळ्या पॉइंंटवर नि:स्वार्थपणे कुठलाही मोबदला न घेता सेवा देत आहेत. संचारबंदीच्या काळात हे सेवानिवृत्त सैनिक पोलिसांसोबत खंबीरपणे उभे आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमय मुंडे, ठाणेदार राजेश राठोड यांनी या सर्व सेवानिवृत्त सैनिकांचे तसेच रजेवर आलेले आणि सध्या सेवा देत असलेल्या तीन सैनिकांचे कौतुक केले आहे.

Web Title: Retired soldiers ran for country service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस