शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निकालापूर्वीच गुणांकनाचे गोडवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:57 IST

‘स्वच्छ सर्वेक्षण’ २०१८ चा निकाल जाहीर होण्यापूर्वीच उत्तम गुणांकनाचे गोडवे गायिले जात आहेत.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण : शहराचे डायनॅमिक रॅकिंग ४२

आॅनलाईन लोकमतअमरावती : ‘स्वच्छ सर्वेक्षण’ २०१८ चा निकाल जाहीर होण्यापूर्वीच उत्तम गुणांकनाचे गोडवे गायिले जात आहेत. देशभरातील ४०४१ शहरांच्या तुलनेत शहराची डायनॅमिक रॅकिंग ४२ अशी असल्याचा दावा होत असून प्रत्यक्षात ती रॅकिंग केवळ स्वच्छता अ‍ॅपवर आधारित असल्याची वस्तुस्थिती नाकारली जात आहे.स्वच्छ सर्वेक्षणात शहर देशभरात ४२ व्या क्रमांकावर असल्याचे ढोल बडवायचे आणि प्रत्यक्षात निकाल अपेक्षेनुरुप लागला नाही तर अधिनिस्थ यंत्रणेवर त्याचे खापर फुटू नये, या भूमिकेतून प्रशासनाने ४२ व्या रॅकिंगची वस्तुस्थिती समजून घ्यावी, अशी अपेक्षा अमरावतीकरांकडून व्यक्त होत आहे.गतवर्षी झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात एकूण ५०० शहरांपैकी अमरावती २३१ व्या क्रमांकावर राहिले होते. त्या अनुषंगाने यंदा महापालिकेने जोरकस प्रयत्न केले. फेब्रुवारीत क्युसीआयच्या चमुने शहराची स्वच्छताविषयक तपासणी केली. या सर्वेक्षणात देशातील ४०४१ शहरे सहभागी झाली आहेत. १० मार्च रोजी संपुष्टात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल एप्रिल अखेर वा मे च्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. तत्पूर्वी केंद्रशासनाने स्वच्छता अ‍ॅपवर आधारित शहराचे डायनॅमिक रॅकिंग दैनंदिन प्रसिद्ध केले. यात शहराची बेस्ट रॅकिंंग २४ होती. १० मार्चला ते रॅकिंग ४२ व्या क्रमांकावर गेले.तथापि ते रॅकिंंग संपूर्ण देशभरातील असल्याचा भ्रम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत शहर ४२ व्या क्रमांकावर असल्याची हाकाटी पिटविली जात आहे. पहिल्या २५ मध्ये असल्याचा दावा मध्यंतरी करण्यात आला. मात्र ते रॅकिंग ४०४१ शहरांच्या तुलनेत नव्हे तर केवळ स्वच्छता अ‍ॅपचा वापर आणि १ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमधील असल्याची वस्तुस्थिती नाकारण्यात आली. शहर २०० वा ३०० व्या क्रमांकापर्यंत गेल्यास ४२ वा क्रमांक सांगून दिशाभूल तर करण्यात आली नाही ना ? असा सवाल व्यक्त होऊ शकतो. देशभरात स्वच्छतेच्या बाबतीत ४२ व्या क्रमांकावर असल्याचे सांगून अनेकजण उर बडवून घेत आहेत. तथापि वस्तुस्थिती वेगळीच आहे.तीन घटकांवर रॅकिंगस्वच्छता अ‍ॅप युझर एंगेजमेंट, एजन्सी रिस्पॉन्सिव्हनेस व युझर हॅपीनेस या तीन घटकांवर डायनॅमिक रॅकिंंग रोजच्या रोज ठरविली गेली. त्यासाठी १ एप्रिल २०१७ ते १० मार्च २०१८ या कालावधीतील अ‍ॅप डाऊनलोडिंग,तक्रारींचे निराकरण आणि नागरिकांचा सकारात्मक अभिप्राय विचारात घेण्यात आला. त्यानंतर स्वच्छता अ‍ॅपवर आधारित शहराची डायनॅमिक रॅकिंग ठरविण्यात आली. ४००० गुणांंच्या स्वच्छता सर्वेक्षण परीक्षेशी त्या रॅकिंगचा सुतराम संबंध नाही.