प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST2021-07-25T04:12:13+5:302021-07-25T04:12:13+5:30

अमरावती : जिल्हा परिषदेतील शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांची प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे तातडीने निकाली काढावी, अशी मागणी महाराष्ट्र ...

Resolve pending questions of primary teachers | प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढा

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढा

अमरावती : जिल्हा परिषदेतील शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांची प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे तातडीने निकाली काढावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष गोकुळदास राऊत, जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा व मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनाद्वारा सेवानिवृत्त शिक्षकांना गटविमा देण्यात यावा, सेवानिवृत्त शिक्षकांना जी.पी.एस. मिळावा, जिल्हा बदलीत विस्थापित झालेल्या शिक्षकांना समुपदेशनाव्दारे त्यांच्या मूळ पदावर स्थापना बदलून देण्यात यावी, जिल्हा परिषद अंतर्गत डीसीपीएस शिक्षकांना एनपीएसमध्ये वर्ग करण्याच्या अगोदर डीसीपीएसचा हिशोब मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिक्षक समितीचे अजय पवार उमेश चुणकीकर, छगन चौधरी, सुनील बोकाडे, विजय ठाकूर, राजेश सावरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Resolve pending questions of primary teachers