जिल्ह्यासाठी १० हजार रेमडेसिविरचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST2021-09-09T04:18:02+5:302021-09-09T04:18:02+5:30
जिल्ह्यात पहिल्या लाटने शहरात थैमान घातले, दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाला कवटाळले. त्यातच रुग्णांची संख्या अधिकच वाढल्यामुळे नागरिकांमध्ये अधिक भीती ...

जिल्ह्यासाठी १० हजार रेमडेसिविरचा साठा
जिल्ह्यात पहिल्या लाटने शहरात थैमान घातले, दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागाला कवटाळले. त्यातच रुग्णांची संख्या अधिकच वाढल्यामुळे नागरिकांमध्ये अधिक भीती निर्माण झाली होती. अनेकांना ऑक्सिजनचा पुरवठा करताना मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे वेळेवर ऑक्सिजन टँकचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठवावा लागला. त्यानंतर सर्वत्र ऑक्सिजनची सुविधा झाली खरी मात्र, रुग्णांना द्यावी लागणारी अत्यंत महत्त्वाची व महागडे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये, सामान्यांची लूट होऊ नये, या उद्देशाने शासनामार्फतच ते सूचना जिल्हाधिकाऱ्यांद्वारा गठित समितीच्या मार्गदर्शनात वितरित करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांची माहिती व त्यापैकी किती रुग्णांना किती रुग्णांना रेमडेसिविर आवश्यक आहे, यावर अभ्यास करून ते इंजेक्शन देण्यात आले. यासाठी जिल्ह्याला १५ हजार इंजेक्शन प्राप्त झाले होते. त्यापैकी ५ हजार इंजेक्शनचा वापर झाला असून १० हजार व्हायल संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने स्टॉक करून ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फार्मासिस्ट योगेश वाडेकर यांनी दिली.
बॉक्स
खासगी रुग्णालयांना पुरवठा नाही
जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णलायांत शासनामार्फत रेमडेसिविर इंजेक्शन पुरविण्यात आले. मात्र, खासगी रुग्णालयांना स्थानिक शासकीय रुग्णालयाकडून रेमडेसिविरचा पुरवठा करण्यात आलेला नव्हता. परंतु, खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांना आवश्यकतेनुसार एफडीएमार्फत तपासणी करून हे इंजेक्शन दिल्या गेल्याची माहिती डॉ. सचिन सानप यांनी दिली.
-------
कोट
आपल्या जिल्ह्याला शासनाकडून १५ हजार रेमडेसिविर व्हायल प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ५ हजार व्हायल आवश्यकतेनुसार रुग्णांना दिल्यात. १० हजार व्हायल शिल्लक आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी १० हजार रेमडेसिविरचा स्टॉक ठेवला आहे.
--
सुपर स्पेशालिटीतील कोविड रुग्णालयाला - ३०००
जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांना २०००