शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

८ आदिवासी जिल्ह्यांत दुसऱ्यांदा 'आरक्षण' व 'बिंदुनामावली' : महसूल मंत्री बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:40 IST

Amravati : अमरावती, वर्धा, नागपुरात आरक्षण केव्हा ?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावतीः राज्यात आदिवासी बहुल असलेल्या यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, पालघर, नंदुरबार व रायगड या आठ जिल्ह्यांत दुसऱ्यांदा जिल्हास्तरीय गट 'क' व गट 'ड' संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी 'सुधारित आरक्षण व बिंदुनामावली' लवकरच निश्चित होणार आहे. यासंदर्भात बुधवार, २५ जून रोजी मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली आहे.

आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) १० टक्के आरक्षणासह सुधारित आरक्षण व बिंदूनामावली विहित करण्याच्या दृष्टीने शासनाला उपाययोजना सुचविणे आणि मंत्रिमंडळास अहवाल सादर करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या बैठका जवळपास पार पडल्या असून लवकरच 'एसईबीसी' प्रवर्गाला आदिवासी बहुल आठ जिल्ह्यांत गट 'क' व गट 'ड' भरतीत १० टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता बळावली आहे.

अमरावती, वर्धा, नागपुरात आरक्षण केव्हा ?अनुसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या या आठ जिल्ह्यात 'एसईबीसी' प्रवर्गाची लोकसंख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. तरीही दहा टक्के आरक्षण चालू ठेवण्यात आले आहे. असे असताना मंत्रिमंडळ उपसमिती 'एसईबीसी'करिता अभ्यास करीत आहे. मात्र वर्धा, जळगाव, गोंदिया, अमरावती, नागपूर, भंडारा, हिंगोली, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात असताना येथे त्या प्रमाणात आरक्षण कधी मिळणार, असा सवाल निवृत्त केंद्रीय सनदी अधिकारी एकनाथ भोये यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला आहे.

 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाAmravatiअमरावती