शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील रानहळदीवर संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

अंजनगावातील राधाबाई सारडा महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख मंगेश डगवाल यांनी रानहळदीवर संशोधन केले. याबद्दल त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली. त्यांनी 'इन्फ्रास्पेसिफिक बायोडायव्हर्सिटी असेसमेंट इन कुरकुमा स्पेसिज फ्रॉम मेळघाट फॉरेस्ट, डिस्ट्रिक्ट अमरावती’ हा शोधप्रबंध विद्यापीठाला सादर केला. अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या माजी संचालक व वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रभा भोगावकर यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.

ठळक मुद्देपीएचडी मिळविली : संरक्षण, संवर्धन आवश्यक; रूप-जनुकांमध्येही आढळतात बदल

सुदेश मोरे।लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : मेळघाटात आढळणाऱ्या बहुगुणी रानहळदीवर येथील प्राध्यापकाने संशोधन करून पीएचडी मिळविली. रानहळद सर्वसाधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आढळत असली तरी ती मेळघाटच्या जंगलात मुबलक प्रमाणात आहे. विशेष म्हणजे, समुद्रसपाटीपासून ७०० मीटरपेक्षा अधिक उंचीवर ती आढळते.अंजनगावातील राधाबाई सारडा महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख मंगेश डगवाल यांनी रानहळदीवर संशोधन केले. याबद्दल त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली. त्यांनी 'इन्फ्रास्पेसिफिक बायोडायव्हर्सिटी असेसमेंट इन कुरकुमा स्पेसिज फ्रॉम मेळघाट फॉरेस्ट, डिस्ट्रिक्ट अमरावती’ हा शोधप्रबंध विद्यापीठाला सादर केला. अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या माजी संचालक व वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रभा भोगावकर यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.रानहळदीचा उपयोग मूळव्याध, जखमेवर अ‍ॅन्टिसेप्टिक म्हणूनसुद्धा केला जातो. मेळघाटातील आदिवासी बांधव त्यांच्या परंपरेनुसार रानहळदीचा उपयोग संमोहनाकरिता तसेच वशीकरण व मायाजाल या क्रियेमध्ये वर्षानुवर्षे करीत आले आहेत, असे संशोधन पुढे आले आहे. या वनस्पतीचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे तिला येणारी फुले.साधारणपणे एखाद्या स्थानावरून, जंगलातून तेथे आढळणाºया वेगवेगळ्या प्रजातींची नोंद केली जाते. मात्र, एकाच प्रजातीच्या वनस्पतींमध्ये आढळणारा वेगळेपणा सहसा नोंदविला जात नाही. काही वेळा एकाच प्रकारच्या वनस्पती जर वेगवेगळ्या भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीमध्ये वाढल्या, तर त्यांच्यात दृश्य- अदृश्य बदल होतात. मात्र, मेळघाटात एकाच भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीत वाढणाºया रानहळदीची झाडे मात्र लक्ष वेधून घेणारे आहेत. त्यांच्यात वैविध्य आहे. हे वैविध्य रंग, रूप तसेच रासायनिक व जनुकीय अशा अदृश्य स्वरूपातही असल्याची नोंद डगवाल यांनी केली आहे.रानहळदीचे संवर्धन व्हावेकोणतीही नवीन प्रजाती एकाएकी तयार होत नाही. अस्तित्वात असलेल्या प्रजातीमध्येच बदल घडवून नवी प्रजाती तयार होत असते. रानहळदीसारख्या वैविध्य असणाºया वनस्पती भविष्यातील नवप्रजातीच्या उत्क्रांतीचा पाया असतात. त्यामुळे मेळघाटातील रानहळदीच्या पट्ट्यांचे संरक्षण व संवर्धन आवश्यक आहे. या दृष्टीने डगवाल यांनी घरीसुद्धा रानहळदीची लागवड केली आहे.

टॅग्स :forestजंगल