शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

आंध्र, तेलंगाणा, गुजरातमधून झाला बोंडअळीचा उद्रेक, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरच्या अहवालात नमूद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 4:49 PM

आवश्यक उपाययोजनादेखील करण्यात आलेल्या नसल्याने गुलाबी बोंडअळीचे संकट उद्भवल्याचा गौप्यस्फोट एसएबीसी व आयएसबीआयच्या अहवालात करण्यात आलेला आहे

 अमरावती - आंध्र प्रदेश, तेलंगणा व गुजरातच्या काही भागात सन २०१५-१६ मध्ये गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला. महाराष्ट्रात या किडींचा फारसा प्रादुर्भाव आढळलेला नव्हता. मात्र, हा महाराष्ट्रात किडीचा उद्रेक होण्याचा धोक्याचा इशारा होता. दुर्दैवाने याकडे फारशा गांभीर्याने पाहण्यात आले नाही. आवश्यक उपाययोजनादेखील करण्यात आलेल्या नसल्याने गुलाबी बोंडअळीचे संकट उद्भवल्याचा गौप्यस्फोट एसएबीसी व आयएसबीआयच्या अहवालात करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रात २००२ मध्ये बीटी बियाणे दाखल झाल्यानंतर सर्व प्रकारच्या बोंडअळीच्या प्रादुर्भावात लक्षणीय घट झाली. या बियाण्यात बोंडअळीपासूनचे अंगभूत संरक्षण पिकाला देऊ केले होते. सुरूवातीला ‘क्राय वन एसी’ हे बियाणे वापरण्यात आले होते. मात्र, एकाच बियाण्याचा वापर कायम राहिल्यास बोंडअळी स्वत:त प्रतिकारक्षमता विकसित करून पुन्हा प्रादुर्भाव करू शकतात, हे लक्षात आल्यानंतर ‘क्राय वन एसी व क्राय वन टूबी’ या दोन जनुकांचा वापर असलेल्या  बोलगार्ड-२ या तंत्रज्ञानाला मान्यता देण्यात आली. या वाणाला शेतकºयांनी उदंड प्रतिसाद दिला. सन २०१०-११ पासून राज्यात कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी ९० ते ९२ टक्के क्षेत्रात बीटी कपाशीची लागवड होऊ लागली. यामध्ये भर म्हणजे, सर्वच प्रकारच्या नोंदणीकृत १००० पेक्षा जास्त बीटी वाणांचे विक्रीस परवानगी देण्यात आली. मात्र, पर्यायी भक्ष पिकांच्या (रेफ्युजी) मूलभूत अटीचे सरसकट उल्लंघन झाले. परिणामी गुलाबी बोंडअळीची प्रतिरोधक क्षमता हळूहळू वाढत गेली. कमी किंवा मध्यम कालावधीच्या वाणांची लागवड न करणे तसेच हंगाम जास्त न लांबविता वेळेतच संपविणे आदी उपाययोजना झाल्याच नसल्याने आताचे संकट ओढावले असल्याचे आयएसबीआय, मुंबई ( इंडीयन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रूव्हमेंट) व एसएबीसी, नवी दिल्ली (साऊथ एशिया बायोटक्नॉलॉजी सेंटर) च्या अहवालात नमूद आहे.

बोंडअळीत प्रतिकारक्षमता विकसित होण्याची कारणे- बोंडअळीवर प्रभावी असलेल्या ‘पायरेथ्राइट’ घटक असलेल्या कीटकनाशकांची शिफारशीच्या मात्रेहून कैकपटीने अधिक फवारणी.- कपाशीच्या क्षेत्रात क्वचितच फेरबदल. वर्षानुवर्षे तीच पीक असल्यानेच किडीचा कायमस्वरूपी मुक्काम.- लागवडीसाठी परवानगी नसलेल्या अनधिकृत बीटी व तणनाशकाला सहनशील बियाण्यांचा वाढता वापर.- दीर्घ कालावधीचे संकरित वाण बोंडाळीला स्थिरावण्यास मदत व खाद्य मिळून अळीचा जीवनक्रम खंडित होत नाही.- १२० दिवसांनतर बीटी बियांण्यांच्या जनुकीय शक्तीत कमी येत असल्यानेच पीक किडीला बळी पडते.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती