‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये वारंवार फिजिकल रिलेशन!

By प्रदीप भाकरे | Updated: May 17, 2023 14:15 IST2023-05-17T14:15:09+5:302023-05-17T14:15:31+5:30

पीडित तरूणीची मे २०२२ मध्ये मावशीकडील लग्नात आरोपी अविनाश याच्याशी ओळख झाली.

Repeated physical relationship in 'live in relationship' in amaravti | ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये वारंवार फिजिकल रिलेशन!

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये वारंवार फिजिकल रिलेशन!

अमरावती: ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असताना प्रियकराने वारंवार फिजिकल रिलेशन ठेवल्याची तक्रार एका तरूणीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात केली आहे. १६ मे रोजी रात्री याबाबत आरोपी अविनाश शेजव (रा. अमरावती) याच्याविरूध्द बलात्कार, मारहाण व धमकीचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, पीडित तरूणीची मे २०२२ मध्ये मावशीकडील लग्नात आरोपी अविनाश याच्याशी ओळख झाली. मोबाईलवरून संवाद वाढला. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध बहरले. दोघांनाही प्रेमासह लग्नाच्या आणाभाका घेतल्या. ऑनलाईन क्लासेसदरम्यान ती आरोपीशी बोलायची. चॅटिंग देखील करायची. जून २०२२ मध्ये फिर्यादी तरूणी परत मुळगावी आईकडे परतली. तिने आई वडिलांना अविनाशबददल सांगून त्याच्याशी लग्न करायचे आहे, अशी मनातली भावना बोलून दाखविली. मात्र, तिच्या आईवडिलांना त्या लग्नसंबंधास नकार दिला. त्यामुळे ती २६ जानेवारी २०२३ ला आरोपीला पळून आली.

यवतमाळमध्ये सोबत राहू लागले

फेब्रुवारी २०२३ मध्ये आरोपी अविनाश व सदर तरूणी यवतमाळ येथे भाड्याने राहू लागले. तेथे आरोपीने फिर्यादीचे मनाविरुदध तिच्याशी शारीरिक संबंध केले. तिने नकार दिला असता देखील त्याने दारु पिऊन तिच्या मर्जीविरुदध वारंवार शोषण केले. तो प्रकार फेब्रुवारी ते १० मे २०२३ पर्यत चालला. १० मे २०२३ रोजी घरमालकीनीने त्यांच्यातील रोजच्या भांडणामुळे भाड्याचे घर सोडायला लावले. तेव्हा ११ मे २०२३ रोजी आरोपी व तरूणी अमरावतीत परतले. तेथे देखील आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले. आरोपीने तिला छोट्या कारणावरुन मारहाण देखील केली.

१५ मे रोजी अमरावतीत मारहाण

आरोपीच्या घरी राहत असताना १५ मे रोजी आरोपीच्या आईने सदर तरूणीला स्वयंपाक करण्यास सांगितला. त्यावर स्वयंपाकासाठी जात असताना अविनाशने तिला वरच्या खोलीत जाऊ नकोस, तेथे सेंट्रींगचे काम सुरू आहे, असे म्हणून तिला ओढले. त्यावर मला भूक लागली आहे, मी स्वयंपाक करते, अशी विनवणी तिने केली. मात्र, त्यावर आरोपीने तिला मारहाण केली. तर पोलिसांत रिपोर्ट दिल्यास तिला धमकी देखील देण्यात आली. त्यामुळे १५ मे रोजी रात्री तिने गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. तक्रार नोंदविली.

Web Title: Repeated physical relationship in 'live in relationship' in amaravti