जिल्ह्यात पुन्हा वादळ, हलका पाऊस
By Admin | Updated: April 12, 2015 00:15 IST2015-04-12T00:15:06+5:302015-04-12T00:15:06+5:30
शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसाने शहरवासीयांना चांगलाच फटका बसला.

जिल्ह्यात पुन्हा वादळ, हलका पाऊस
वीजपुरवठा खंडित : सुसाट वाऱ्याने नागरिकांची तारांबळ
अमरावती : शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसाने शहरवासीयांना चांगलाच फटका बसला. अर्धा तास चाललेल्या सुसाट वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अर्ध्याअधिक शहराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने या भागात काळोख पसरला होता.
सायंकाळी सुसाट वारा सुरु होताच नागरिकांची एकच धावपळ सुरु झाली. वाऱ्याचा वेग बघून काही तरी अनर्थ होईल, असा अंदाज बांधला जात असताना सुसाट वारा थांबला अन् पावसाचे आगमन झाले. सुसाट वाऱ्याने विजेचे खांब, होर्डिग्ज, फ्लेक्स, वृक्षांनाही फटका बसला.