जुने नियम रद्द करून शेतकऱ्यांच्या द्या तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST2021-07-19T04:09:46+5:302021-07-19T04:09:46+5:30
प्रवीण पोटे, बाळासाहेब पाटील यांना पत्र अमरावती : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तीन लाखांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जाचा लाभ घेण्याकरिता बँकेचे जुने ...

जुने नियम रद्द करून शेतकऱ्यांच्या द्या तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
प्रवीण पोटे, बाळासाहेब पाटील यांना पत्र
अमरावती : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तीन लाखांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जाचा लाभ घेण्याकरिता बँकेचे जुने नियम रद्द करण्यात यावे, या मागणीचे पत्र आमदार प्रवीण पोटे यांनी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना पाठविले.
महागाईच्या परिस्थितीत एक लाखाच्या कर्जाची मर्यादा वाढवून तीन लाख रुपये करण्यात आली आहे. शून्य टक्के दराने बिनव्याजी कर्ज शेतकऱ्यांना मिळणार असल्याने दिलासा देणारी घोषणा आहे. शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शेती कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी बँकेत शेती गहाण ठेवण्याच्या नियमात बदल करण्यात यावा. तीन लाखांपर्यंत शेती कर्जाला कुठलीही नियमावली ठेवण्यात येऊ नये, जुने नियम रद्द करण्यात यावे, असे आ. पोटे यांनी ना. बाळासाहेब पाटील यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.