बडनेरा येथे रिंगण सोहळा, गजाननभक्तांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:25 IST2018-11-10T21:25:38+5:302018-11-10T21:25:59+5:30
२०० गजानन भक्तांचा समावेश असणाऱ्या पायी वारीचे प्रस्थान शनिवारी बडनेऱ्यातून शेगावकडे झाले. तत्पूर्वी, भव्य मिरवणूक व श्वाचा रिंगण सोहळा रंगला. भाविकांची यावेळी मोठी गर्दी होती. जुनी वस्तीतील श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बडवेरा ते शेगाव वारी काढण्यात येते.

बडनेरा येथे रिंगण सोहळा, गजाननभक्तांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : २०० गजानन भक्तांचा समावेश असणाऱ्या पायी वारीचे प्रस्थान शनिवारी बडनेऱ्यातून शेगावकडे झाले. तत्पूर्वी, भव्य मिरवणूक व श्वाचा रिंगण सोहळा रंगला. भाविकांची यावेळी मोठी गर्दी होती.
जुनी वस्तीतील श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बडवेरा ते शेगाव वारी काढण्यात येते. यंदा या वारीचे सातवे वर्षे आहे. महिला व पुरुष मिळून २०० गजानन भक्तांनी या वारीत सहभाग घेतला. माळीपुºयातील गजानन महाराज मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जुन्या वस्तीतून गजानन भक्त पालखीसह फिरलेत. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. शहरवासीयांचादेखील यात मोठ्या संख्येने सहभाग होता. नंतर सावता मैदान येथे अश्व रिंगण सोहळा पार पडला. हा आकर्षक सोहळा पाहण्यासाठी गजानन भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या पालखीत दरवर्षी पायी वारी करणाºयांची संख्या वाढत आहे. रिंगण सोहळ्यामुळे बडनेरातील वातावरण भक्तीमय झाले होते. सर्वत्र महाराजांचा जयघोष होता. सात दिवस या वारीचा प्रवास राहील. वारी प्रस्थानप्रसंगी आ. रवि राणा, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, विलास इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते.