लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : नजीकच्या नारगावंडी येथील शुभम गजानन वारंगणे (२३) याचा नातेवाईक महिलेच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने खून करण्यात आल्याचा उलगडा दत्तापूर पोलिसांनी केला. त्याचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी यवतमाळ मार्गावर आढळला होता. तासाभरात पोलिसांनी महिलेसह चौघांना याप्रकरणी अटक केली.
समृद्धी दत्तापूर पोलिसांनी महामार्गालगत गोदामाजवळ असलेल्या घटनास्थळी पंचनामा केला व तात्पुरता मर्ग दाखल करून तपासाला प्रारंभ केला. यावेळी नातेवाईक महिलेने घटनास्थळ वेगळेच सांगितल्याने ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे धैर्य गमावलेल्या महिलेने शुभम हा अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने त्याच्या खुनाचा कट रचल्याचे कबूल केले. पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारांवर मनोज कीर्तने (रा. जुना दत्तापूर), अमोल सुरेश अर्जुने (रा. जुना दत्तापूर) व अशोक ऊर्फ चिवडा व्यंकटराव चवरे (६५, रा. नारगावंडी) यांच्यासह महिलेला शुभमच्या खूनप्रकरणी अटक केली.
दरम्यान, दत्तापूर पोलिसांनी तासाभरात चौघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा कबूल केला. मृताच्या मामाच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गिरीश ताथोड,सहायक निरीक्षक गजानन गजभारे, उपनिरीक्षक पुंडलिक चव्हाण, जमादार अतुल पाटील, हरिहर वैद्य, दीपक पंधरे, सागर कदम, नवनाथ खेडकर, नाईक पवन हजारे, कॉन्स्टेबल किरण पवार, नीलिमा खडसे, मयूर ढवक, चालक पीयुष चौबे यांनी ही कारवाई केली.
दोघांनी काटा काढला
सूत्रांनुसार, मनोज कीर्तने व ती महिला यांच्यात अनैतिक संबंध होते. त्याला शुभमचा विरोध असल्याने दोघांनी त्याचा काटा काढण्याचे ठरविले. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी मनोजने अमोल व अशोक यांच्या मदतीने शुभमला दुचाकीवर बसवून आसेगाव शिवारात समृद्धी महामार्गाला लागून असलेल्या गोदामाजवळील शेतातील पडीत जागेवर नेले. तेथे हात व पाय दोरीने करकचून बांधून शरीरावर दांडक्यांनी प्रहार केला. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शुभमचा जागीच मृत्यू झाला.
Web Summary : शुभम Warangne was murdered for objecting to his relative's affair. Police arrested the woman and three accomplices near Nargaonvandi. They confessed to the crime, revealing the murder was premeditated. The victim was beaten to death in a field.
Web Summary : शुभम वारंगणे की हत्या इसलिए की गई क्योंकि उन्होंने अपनी रिश्तेदार के संबंध का विरोध किया था। पुलिस ने नारगाँवंडी के पास महिला और तीन साथियों को गिरफ्तार किया। उन्होंने अपराध कबूल कर लिया, जिससे पता चला कि हत्या सुनियोजित थी। पीड़िता को एक खेत में पीट-पीटकर मार डाला गया।