आयपीएस यादवचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, एसीबीकडून तीन मुद्द्यांचा जबाब सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 18:57 IST2018-02-15T18:56:58+5:302018-02-15T18:57:38+5:30
अवैध रेतीचा पकडलेल्या ट्रकसंदर्भात चार्जशिट न्यायालयात सादर न करण्यासाठी एक लाखाची लाच घेणारा आयपीएस विजयकृष्ण यादव याचा अटकपूर्व जामीन अर्ज नांदेडचे चौथे जिल्हा न्यायाधीश सय्यद अकबर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या तपास अधिका-यांनी सादर केलेल्या जबाबामधील तीन प्रमुख मुद्द्यांमुळे फेटाळून लावला आहे.

आयपीएस यादवचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, एसीबीकडून तीन मुद्द्यांचा जबाब सादर
अमरावती - अवैध रेतीचा पकडलेल्या ट्रकसंदर्भात चार्जशिट न्यायालयात सादर न करण्यासाठी एक लाखाची लाच घेणारा आयपीएस विजयकृष्ण यादव याचा अटकपूर्व जामीन अर्ज नांदेडचे चौथे जिल्हा न्यायाधीश सय्यद अकबर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या तपास अधिका-यांनी सादर केलेल्या जबाबामधील तीन प्रमुख मुद्द्यांमुळे फेटाळून लावला आहे.
नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील पंजाब रेस्टॉरंटमध्ये ३० जानेवारी २०१८ रोजी दुपारी १ ते २ या वेळेत सन्नीसिंग बंगुई या युवकाने तेथील इतवारा उपविभागाचे आयपीएस अधिकारी जी. विजयकृष्ण यादव यांच्यासाठी एक लाख रुपयाची लाच स्वीकारली. त्यावेळी अमरावती एसीबीच्या पथकाने त्या युवकाला जेरबंद केले. अर्धापूर पोलीस ठाण्यात त्याच्यासह आयपीएस यादवविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्या युवकाला नांदेडच्या विशेष न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली व दुसºया दिवशी जामीन मंजूर झाला. आयपीएस यादव हा त्यावेळी हैदराबाद येथे प्रशिक्षण घेत होता आणि तेथूनच गायब झाला. त्यानंतर त्याच्या निलंबनाचे आदेश निघताच ७ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता.
एसीबीचे पोलीस निरीक्षक राहूल तसरे यांनी ९ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा न्यायालयात जबाब सादर केला. त्यामधे यादवने ५ सप्टेंबर २०१७ रोजी हैदराबाद येथे झालेल्या लाच मागणी पडताळणीच्या वेळी एपी २१ बीडी ५९९१ ही चारचाकी गाडी वापरली होती. ती जप्त करायची आहे तसेच त्यातून काही पुरावे भेटतात का, याची पडताळणी व्हायची आहे. याशिवाय यादवने तक्रारदार हरिहर पुरी यांच्याकडून पूर्वीच एक लाख रुपये घेतले होते, तेसुद्धा जप्त करणे आहे. त्याने मोबाइलवर लाच मागणीचे संदेश पाठविले आहेत तसेच अनेकदा लाचेची बोलणी केली आहे. यामुळे त्याची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे एसीबीने नमूद केले. या मुद्द्यांवर न्या. सय्यद अकबर अली यांनी जमीन अर्ज फेटाळला. या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने अमरिकसिंग वासरीकर आणि रणजित देशमुख यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
चालकाने केली अधिका-याला मदत
आयपीएस यादव याच्या शासकीय वाहनाच्या चालकाने अटकपूर्व जामीनप्रकरणात खूप प्रयत्न केले. याशिवाय तो विनापरवानगी यादवसोबत हैदराबाद येथे तीन दिवसांसाठी गेला होता, अशी माहिती वरिष्ठ अधिकाºयांना प्राप्त झाल्यानंतर त्याला पुन्हा इतवारा येथे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नांदेड येथील आयपीएस यादव याच्या घराची झडती घेतली. तेथे काहीच आढळून आले नाही. आरोपीचा शोध लवकरात लवकर घेतला जाईल.
- राहुल तसरे,
(तपास अधिकारी, एसीबी, अमरावती विभाग