पूरग्रस्तांचे पुनर्वसन, अन्न सुरक्षेचा लाभ द्या

By Admin | Updated: August 1, 2014 00:04 IST2014-08-01T00:04:22+5:302014-08-01T00:04:22+5:30

तालुक्यात २७ जुलै रोजी झालेल्या पूर्णेच्या महाप्रलयकारी पुरामुळे नदीकाठच्या २० वर गावांतील हजारो कुटुंबांना झळ पोहोचली. त्यांच्या घरांची पडझड झाली असून शेकडो कुटुंब बेघर झाले आहे.

Rehabilitation of flood affected people, give benefits of food security | पूरग्रस्तांचे पुनर्वसन, अन्न सुरक्षेचा लाभ द्या

पूरग्रस्तांचे पुनर्वसन, अन्न सुरक्षेचा लाभ द्या

भाजपाची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन
चांदूरबाजार : तालुक्यात २७ जुलै रोजी झालेल्या पूर्णेच्या महाप्रलयकारी पुरामुळे नदीकाठच्या २० वर गावांतील हजारो कुटुंबांना झळ पोहोचली. त्यांच्या घरांची पडझड झाली असून शेकडो कुटुंब बेघर झाले आहे. यात शेतीचेही नुकसान झाले. त्यांना त्वरित मदत देऊन घर गमावलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करावे, त्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी तालुका भाजपच्यावतीने तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
तालुका भाजपाने जि. प. सदस्य व आरोग्य सभापती मनोहर सुने, तालुका भाजपाध्यक्ष रवी पवार, अशोकराव बनसोड, प्रमोद कोरडे, बाळासाहेब अलोने यांचे नेतृत्वात दिलेल्या निवेदनानुसार २७ जुलै रोजी पूर्णा धरणाचे सर्व ९ दरवाजे एकदम उघडल्यामुळे पूर्णा नदीने विक्राळ रूप धारण केले. प्रशासनाची मदत येण्याअगोदरच नदीकाठच्या ब्राम्हणवाडा (थडी), देऊरवाडा, काजळी, थुगाव, पिंप्री, निंभोरा, हिरूळ पूर्णा, कुरळपूर्णा, तुळजापूर गढी, टाकरखेडा, आसेगाव, राजना आदी गावात पूर्णेचे पाणी शिरले तर शिरजगाव बंड, आखतवाडा, खरवाडी, खराळा, प्रल्हादपूर, जैनपूर, जवळा, माधान, घाटलाडकी, सोनोरी, नानोरी आदी गावातील शेती खरडून गेली. चिंचोली, बेलोरा, राजुरा, वाठोडा आदी गावांतील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात घरामधील धान्य पाण्यामुळे पूर्णत: नष्ट झाले. या पुराने अनेक गावांत घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली. या समस्यांची गंभीर दखल घेऊन शासनाने याची सोडवणूक त्वरित करावी, आपदग्रस्तांना त्वरीत आर्थिक मदत करून नदीकाठावरील व नाल्याकाठावरील कुटुंबाचे त्वरीत पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात आली असून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नंदकिशोर मडघे, टिंकू अहिर, दिवाकर तायवाडे, प्रकाश झोलेकर, दिवाकर तायवाडे, जगदीश तायवाडे, राजेश जावरकर, किशोर मेटे, प्रमोद मडघे, कमल माहोरे, सुनील पवार, जयकिसन भुजाडे, अरूण पाथरकर, अमोल ठाकूर, राजाभाऊ ढवळे, अतुल दारोकार, मनोज ठाकूर, रामू गावंडे, नितीन अलोणे, बाबू सहारे, कृणाल सोळंके, सचिन अग्रवाल, आनंद खांडेकर, पांडुरंग भागवत, सागर घोंगडे, गोपी राठोड, रावसाहेब घुलक्षे, शाम रामेकर, पंकज देशमुख, मुरली माकोडेंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Rehabilitation of flood affected people, give benefits of food security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.