विशेष सर्वेक्षणात १९ हजार ४५ नागरिकांच्या नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:01 IST2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:01:07+5:30

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास अशा सर्व रूग्णांना शोधून त्याची तपासणी तसेच त्यांना वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण व शहरी भागात आतापर्यंत चार टप्प्यांत ही सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली. ३० जूनअखेर पोर्टलवर ग्रामीण भागातील १६१०० नागरिकांच्या नोंदी झाल्या आहेत. यात जोखीम गटातील ८ हजार ६००, तर बाहेरून आलेले ५,३०० नागरिक आहेत.

Registration of 19 thousand 45 citizens in special survey | विशेष सर्वेक्षणात १९ हजार ४५ नागरिकांच्या नोंदी

विशेष सर्वेक्षणात १९ हजार ४५ नागरिकांच्या नोंदी

ठळक मुद्दे'डोअर टू डोअर' मोहीम; आजारी व्यक्तींवर संनियंत्रण, ८ हजार ६०० नागरिक अति जोखमीतील

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात पुन्हा 'अमरावतीकर करूया कोरोनावर वॉर' ही विशेष सर्वेक्षण मोहीम प्रत्येक गावात तसेच नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात २३ ते ३० जून दरम्यान राबविण्यात आली. डोअर टूू डोअर या आठवडाभराच्या मोहिमेत १९ लाख ४५ नागरिकांचा सर्व्हे करण्यात आला. दरम्यान जोखीम गटातील नागरिक तसेच ८ जूननंतर गावात बाहेरून आलेले तसेच गावातील लक्षणे आढळून आलेल्या नागरिकांच्या पोर्टलवर नोंदी घेण्यात आल्या आहेत.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास अशा सर्व रूग्णांना शोधून त्याची तपासणी तसेच त्यांना वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण व शहरी भागात आतापर्यंत चार टप्प्यांत ही सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली. ३० जूनअखेर पोर्टलवर ग्रामीण भागातील १६१०० नागरिकांच्या नोंदी झाल्या आहेत. यात जोखीम गटातील ८ हजार ६००, तर बाहेरून आलेले ५,३०० नागरिक आहेत. विविध गावातील १० हजार ८०० नागरिकांना सर्दी, ताप, खोकला व श्र्वसनाचा आजार असल्याची सर्वेक्षणात नोंद केली आहे. सर्दी, ताप, खोकला व श्र्वसनाचा त्रास असलेले, जोखीम गटातील, तसेच लक्षणे असलेल्या नागरिकांना व राज्य, जिल्हा व इतर जिल्ह्यातून आलेल्या अशा दोन्ही मिळून १६१०० व्यक्तींसोबत माहिती घेण्यासाठी थेट मोबाईलवर संवाद साधण्यात येत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय विकास अधिकारी यांचेमार्फत आजारी नागरिकांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यानुसार सर्वेक्षणाच्या कालावधीत गावस्तरीय आरोग्य व दक्षता समितीमार्फत गावातून नियमितपणे कामानिमित्त गावाच्या बाहेर ये-जा करणाऱ्या व्यक्तीची यादी तयार करून नोंद घेणे सदर नागरिकांकडून वैयक्तिक प्रवासा दरम्यान दक्षता कामाच्या ठिकाणी स्वच्छताविषयक व आरोग्यविषयक सूचनांचे पालन करण्यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच गावस्तरावरील दुकानदार व अन्य व्यावसायिकांना वेळोवेळी खबरदारीसाठी ग्रामपंचायत, कोराना दक्षता व गावस्तरीय समितीव्दारे सूचना दिल्या आहेत.

आठवडाभराच्या विशेष सर्वेक्षण मोहिमेत आजारी असलेल्या व बाहेरून आलेल्या तसेच संख्यात्मक व गृहविलगीकरणात अससलेल्या व्यक्तींसोबत आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी कॉल सेंटरव्दारे संवाद साधला जात आहे. अशा व्यक्तींवर संनियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व कोरोना दक्षता समिती लक्ष ठेवून आहे.
- अमोल येडगे,
मुख्यकार्यकारी अधिकारी

'कोरोना वॉर एएमटी'वर नोंदणी
या मोहिमेत गावांमधील अतिजोखमीच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहेत. असंसर्गजन्य आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब कर्करोग, क्षयरोग व इतर ६० वर्षांवरील ज्येष्ठांसह सर्वच नागरिकांच्या नोंदणी करण्यात आलेल्या आहेत. सर्वेक्षणातील सर्व माहितीच्या नोंदी 'कोरोना वॉर एएमटी' या पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे.
 

Web Title: Registration of 19 thousand 45 citizens in special survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.