शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

अमरावतीत आयकर विभागाकडून आकस्मिक धाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 2:35 PM

शहरात आयकर विभागाचे आकस्मिक धाडसत्र बुधवारपासून सुरू झाले आहे. मुंबई, नागपूरसह विविध जिल्ह्यांतून २७ पथके शहरातील उद्योजक, व्यापारी व बिल्डरांकडील कागदपत्रांची तपासणी करीत आहेत.

अमरावती : शहरात आयकर विभागाचे आकस्मिक धाडसत्र बुधवारपासून सुरू झाले आहे. मुंबई, नागपूरसह विविध जिल्ह्यांतून २७ पथके शहरातील उद्योजक, व्यापारी व बिल्डरांकडील कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. 

अमरावती शहरात बुधवारी सकाळी १० वाजतापासून उद्योजक, व्यापारी, बिल्डरांकडे आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्या आहेत. प्रत्येकी पाच अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या २७ पथकांनी या धाडी टाकल्या. हे अधिकारी व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारासंबंधी दस्तावेज तसेच इतर कागदपत्रांची छाननी करीत आहेत. या पथकाला रायफलधारी पोलिसाचा बंदोबस्त देण्यात आला आहे. ‘इन कॅमेरा’ चौकशीसाठी कॅमेराची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. 

दरम्यान, ही कार्यवाही दोन ते तीन दिवस चालेल. त्यानंतर यासंबंधी अहवाल तयार केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. प्रवीण मालूंचीही चौकशी अमरावती येथील प्रख्यात बिल्डर प्रवीण मालू यांच्या घर व कार्यालयाचीही आयकर विभागाच्या एका पथकाकडून झडती घेणे सुरू केले आहे. सकाळी १० वाजता सुरू झालेली ही कार्यवाही वृत्त लिहिस्तोवर सुरूच होती.

टॅग्स :AmravatiअमरावतीIncome Taxइन्कम टॅक्सbusinessव्यवसाय