लसीकरणाचा रेकॉर्डब्रेक परफॉमन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:17 IST2021-08-27T04:17:55+5:302021-08-27T04:17:55+5:30

अमरावती : लसीकरणाला कधी ब्रेक तर कधी दोन ते तीन दिवसाआड लसीकरण अशा स्थिती होती.परंतु असे असले तरीही आरोग्य ...

Record-breaking performance of vaccination | लसीकरणाचा रेकॉर्डब्रेक परफॉमन्स

लसीकरणाचा रेकॉर्डब्रेक परफॉमन्स

अमरावती : लसीकरणाला कधी ब्रेक तर कधी दोन ते तीन दिवसाआड लसीकरण अशा स्थिती होती.परंतु असे असले तरीही आरोग्य विभागाने लसीकरणात सातत्य ठेवले. परिणामी आतापर्यत १० लाखाचा लसीकरणाचा आकडा पार केला आहे.विशेष म्हणजे लसीकरण मोहिमेत आरोग्य यंत्रणेने २१ ऑगस्ट रोजी पहिला व दुसरा डोस मिळून ३० हजार ८५० जणांचे लसीकरण करण्यातही यश मिळविले आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्यामुळे कधी ब्रेक तर काहीवेळा विक्रम अशा विरोधाभासी प्रसंगाना पुढे जात आरोग्य यंत्रणेने लसीकरणाचा १० लाखाचा टप्पा पार केला आहे. महिन्यात लस उपलब्ध नसल्यामुळे बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागली. परंतु नंतरच्या काही दिवसात ही प्रतीक्षा संपली. सुरूवातीला कमी प्रतिसाद होता. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लसीचे महत्त्व कळू लागले. त्यामुळेच एकेकाळी लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या मेळघाटातील चिचखेड गावाला ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्याचा राज्यात पहिला मान मिळविला आहे. प्रारंभी लस घेण्यासाठी कोणी पुढाकार घेत नव्हते नंतरच्या काळात मात्र सर्वांनाच लस हवी, असे चित्र निर्माण झाले. डीएचओ डॉ. दिलीप रणमले, सीएस डॉ. शामसुंदर निकम, जिल्हा लसीकरणाचे डॉ. विनोद करंजीकर, सांख्यिकी अधिकारी राजकुमार मुळे यांनी रोजच्या कामात अधिक गती आणली आहे.

बॉक्स

दूष्टिक्षेपात लसीकरण

३ जुलै - २७ हजार ५०

१४ -२५२१४

१७ ऑगस्ट -२१ हजार २६

२१ ऑगस्ट ३० हजार ८५०

बॉक्स

तालुकानिहाय लसीकरण आकडे

अचलपूर २५२२, अमरावती २७५३, अंजनगाव सुर्जी १७७२, भातकुली २३६९, चांदूर बाजार २६६१, चांदूर रेल्वे १५८५, चिखलदरा १३३, महापालिका क्षेत्र ३४८७, दर्यापूर ३१७५, धारणी ५०, धामणगाव रेल्वे २२६८, मोर्शी १८१६, नांदगाव खंडेश्वर १४८०, तिवसा २०७८, वरूड ३३८७, डी.एच. ३०८ असे शनिवार २१ ऑगस्ट रोजी एकूण ३८५० लसीकरण एकाच दिवशी आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण करण्यात आले.

Web Title: Record-breaking performance of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.