तीन लाखांच्या आतील विकासकामांना मान्यता

By Admin | Updated: May 30, 2015 00:39 IST2015-05-30T00:39:49+5:302015-05-30T00:39:49+5:30

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार रजेवर गेले असल्याने नगरसेवकांनी सुचविलेली काही महत्त्वाची कामे होत ...

Recognition of the development works of the three lakhs | तीन लाखांच्या आतील विकासकामांना मान्यता

तीन लाखांच्या आतील विकासकामांना मान्यता

अतिमहत्त्वाच्या कामांना प्राधान्य : आयुक्तांच्या भ्रमणध्वनीवरुन अभियंत्यांना सूचना
अमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार रजेवर गेले असल्याने नगरसेवकांनी सुचविलेली काही महत्त्वाची कामे होत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे आता ५० हजारांच्यावर तर तीन लाखांच्या आतील कामे घेता येतील, अशा सूचना आयुक्तांनी अभियंत्यांना दिल्या आहेत. परिणामीे पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना वेग येईल.
प्रशासनात गतीमानता आणण्यासाठी आयुक्त गुडेवार यांनी काही अपहार, अतिक्रमण हटाव मोहीम, फौजदारी कारवाईचा सपाटा लावला आहे. परंतु विकासकामे ठप्प पडल्याची ओरड नगरसेवकांची होती. आवश्यक कामे करण्यासंदर्भात पत्र दिल्यानंतरही अभियंते त्या कामांचे दर करार केले जात नाहीत, असा आक्षेप घेत होते. आयुक्तांच्या आदेशाशिवाय कामांचे दर-करार करता येणार नाही, ही भूमिका अधिकारी, अभियंत्यांनी घेतली होती. त्यामुळे नगरसेवकांनी कामासंदर्भात पत्र दिले तरीही ते पत्र प्रलंबित राहिले. दरम्यान आयुक्त रजेवर गेल्याने नगरसेवकांनी कामे होत नसल्याची ओरड वाढविली होती. त्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिमहत्त्वाची विकासकामे घेण्यास हरकत नाही. मात्र, ही कामे तीन लाखांच्या वरची असता कामा नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अभियंत्यांनी कामांची गरज लक्षात घेत इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ५० हजारांच्या वर तर तीन लाखांच्या आतील नगरसेवकांची कामे अभियंत्यांना घेता येतील.
- चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका

Web Title: Recognition of the development works of the three lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.