शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर जगदीश गुप्ता यांची भाजपमधून दुसऱ्यांदा हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 11:10 IST

Amravati : रमेश बुंदिले, तुषार भारतीय, प्रमोद सिंह गडरेल यांचेही निलंबन

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : स्वतःला अमरावती विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अनधिकृत उमेदवार संबोधणाऱ्या जगदीश गुप्ता यांची खुद्द भाजपनेच पक्षातून हकालपट्टी केली आहे. यापूर्वी देखील सन २०११ मध्ये त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले होते, हे विशेष. याशिवाय प्रदेश कार्यकारिणी सदस्य तुषार भारतीय आणि प्रमोद सिंह गडरेल यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

प्रदेश भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांच्या स्वाक्षरीने ५ नोव्हेंबर रोजी ४० बंडखोरांना भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. त्यात भाजप घटक पक्ष असलेल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांचादेखील समावेश आहे. गुप्ता यांना निलंबन नवे नाही. मात्र, आताच्या ताज्या निलंबनामुळे त्यांच्या राजकीय गलबताला भलेमोठे भगदाड पडले आहे. निलंबनामुळे त्या गलबतात पाणी शिरू लागल्याने समर्थक देखील सैरावैरा झाले आहेत. विशेष म्हणजे, आपण १२ वर्षे अर्थात तब्बल एक तप कुठे होता, असा प्रश्न त्यांना मतदार विचारू लागले आहेत. 

आपण जर 'पार्टी विथ डिफरंस'चे सन्माननीय सदस्य होतात आणि अमरावतीची सीट भाजपप्रणीत महायुतीतील अजित पवार गटाला सुटली आहे, हे ज्ञात असूनही आपली बंडखोरी का, असा सवाल गुप्ता यांना त्यांच्या समर्थकांतून विचारला जात आहे. सन २०१२ च्या महापालिका निवडणुकीत देखील गुप्ता यांनी भाजपशी फारकत घेऊन जनकल्याण आघाडी स्थापली होती. मात्र त्यावेळी जनकल्याण आघाडीचा केवळ एक उमेदवार निवडून आला होता. तब्बल २२ वर्षे आमदारकी भूषविणाऱ्या जगदीश गुप्तांच्या जनकल्याणचा केवळ एक नगरसेवक निवडून यावा, ही गुप्ता यांची राजकीय सही संपल्याची घंटा होती. त्यामुळे तब्बल एक तपानंतर गुप्ता यांची रि एन्ट्री त्यांच्याच समर्थकांना बुचकळ्यात पाडणारी ठरली आहे. गुप्ता यांना समर्थ करणारे भाजप पदाधिकारी रडारवर आहेत. 

दर्यापुरात युवा स्वाभिमानला धक्का दर्यापूरचे भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले हे सध्या युवा स्वाभिमान पार्टीकडून निवडणूक लढत आहेत. बुंदिले हे भाजपचे पदाधिकारी असून, त्यांनी राजीनामा न देता अन्य पक्षातून उमेदवारी दाखल केली आहे. हा प्रकार पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारी असल्यामुळे रमेश बुंदिले यांना भाजपतून निलंबित करण्यात आल्याचे पत्र बुधवारी भाजप प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी जारी केले आहे. भाजपने बुंदिले यांना बंडखोर उमेदवार ठरविल्याने युवा स्वाभिमानला झटका मानला जात आहे. रमेश बुंदिले यांच्या प्रचारात सहभागी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सुद्धा कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाElectionनिवडणूक 2024Amravatiअमरावती