शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पुर्नवसित ग्रामस्थाची मेळघाटात पुन्हा धाव, पोटपखेड गेटवर पोलीस व वनकर्मचारी तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2017 3:03 PM

मेळघाटामधून अकोट तालुक्यात पुर्नवसित झालेल्या आठ गावातील ग्रामस्थानी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावात परतण्याचा निर्धार केला.

- विजय शिंदे

अकोट- मेळघाटामधून अकोट तालुक्यात पुर्नवसित झालेल्या आठ गावातील ग्रामस्थानी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावात परतण्याचा निर्धार केला. मेळघाट मार्गावर असलेल्या केलपाणी या गावात  9 डिसेंबर रोजी  सकाळपासुन सर्व ग्रामस्थ एकत्र झाले आहेत. या ग्रामस्थाची मनधरणी करीता  पोलीस, वनविभाग व महसुल विभागाचा मोठा ताफा पोपटखेड गेटवर तैनात  करण्यात आला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर पुर्नवसित ग्रामस्थानी मेळघाटात पुन्हा परण्याचे हत्यार उपसल्याने अधिवेशनात पुर्नवसित गावाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गाभाक्षेत्रातील अमोना, बारूखेडा, धारगड,सोमठाणा खुर्द, गुल्लरघाट, नागरतास, केलपाणी, सोमठाणा बु. या गावातील ग्रामस्थानी जमीन, रोजगार ,सोई-सुविधा व आरोग्य यंत्रणामुळे होणारे ग्रामस्थांच्या मृत्युचा मुद्दा पुढे करीत  इतर मागण्याकरीता 9 सप्टेबर रोजी मुलाबाळासह प्रशासनाचे बंदी आदेश झुगारत खटकालीचे गेट तोडून मेळघाटात पोहचले होते. त्यावेळी आयुक्त पियुषसिंह,  मुख्य उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी,अकोला जिल्हाधिकारी आस्तिक पाण्डेय, अमरावती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मेळघाटात ग्रामस्थाची 15 तास मनधरणी करून  मागण्याची पुर्तता करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थ परतले होते. 

मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल व आमदाल बच्चु कडू यांनी प्रशासनाला अल्टीमेट देत ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहिले. आंदोलनाची दखल घेत पुर्नवसित ग्रामस्थाचे प्रश्न मार्गी लावण्याकरीता मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस व मुख्यसचिव डॉ.  प्रविण परदेशी सोबत बैठक पार पडली. शासनाने मुलभूत सुविधा करीता तातडीने 10 कोटीचेवर निधी मंजुर केले. परंतु तीन महीने उलटुनही असुविधा जैसे थे असल्याचे पाहता. ग्रामस्थानी मालकीची शेतजमीन व उदरनिर्वाहाचा प्रश्नाने त्रस्त झालेल्या ग्रामस्थानी पुन्हा दिलेल्या अल्टीमेंटनुसार मेळघाटात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार  मुलंबाळ व घर साहित्यासह ग्रामस्थ केलपाणीत एकत्र होत आहेत. आतापर्यंत एक हजाराचेवर आदिवासी बांधव, ग्रामस्थ केलपाणीत पोहचले आहेत. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, उपवनसंरक्षक  गुरूप्रसाद ,उपविभागीय पोलीस अधिकारी गावित, तहसिलदार विश्वनाथ घुगे,अचलपूर एसडीओ व्यकंट राठोड, धारणी एसडीओ विजय राठोड, चिखलदरा तहसिलदार विजय पवार, अचलपूर तहसिलदार निर्भय जैन, अकोट ग्रामीण पोलीस निरिक्षक मिलिंद बाहाकर  अकोला अमरावती जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी,वन व महसुल विभागाचा ताफा हजर आहे. केलपाणीत एकत्र जमा झालेले ग्रामस्थाची  प्रशासनाकडुन समजूत काढण्यात येत असली तरी ग्रामस्थ कोणत्याही क्षणी मेळघाटात चाल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.