शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

बडनेरातून रवी राणांची उमेदवारी जाहीर; भाजपचा एक गट अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 13:12 IST

Amravati : उपमुख्यमंत्र्यांकडून हिरवी झेंडी; महाविकास आघाडीचे ठरेना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे सलग तीनदा प्रतिनिधित्व करणारे आमदार रवी राणा यांना मंगळवारी युवा स्वाभिमान पार्टीने बडनेरातून उमेदवारी जाहीर केली आहे, तर आपल्या उमेदवारीला महायुतीच्याच नेत्यांनी हिरवी झेंडी दाखविली असल्याचा दावा खुद्द राणा यांनी केल्याने भाजपचा एका गट प्रचंड अस्वस्थ आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते मतदारसंघात ठाण मांडून आहेत. मात्र, महाविकास आघाडी वा अन्य पक्षांकडून अद्यापही बडनेरातून कोण? याबाबत निर्णय झालेला नाही, हे विशेष. 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतून बडनेरा मतदारसंघ हा युवा स्वाभिमान पार्टीच्या वाट्याला जाईल, असे संकेत दीड महिन्यापूर्वी दिले असल्याचे राणा यांनी सांगितले होते. त्यामुळे भाजपने जाहीर केलेल्या यादीत बडनेराचा समावेश नव्हता. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार मित्रपक्षाच्या सीटिंग आमदारांना उमेदवारी देण्याचा निर्णय अगोदरच झाला आहे. त्यामुळे भाजपमधून काहीजण बडनेरातून दावेदारी करीत असले तरी ही जागा रवी राणा यांना सोडण्यात येणार आहे, हे जवळपास निश्चित आहे; परंतु बडनेरातून महाविकास आघाडीतून उमेदवारी कुणाला, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेसुद्धा बडनेरात दावा केला आहे. 

म्हणूनच प्रचार सुरू केला महायुतीतून बडनेऱ्याची जागा आमदार रवी राणा यांना देण्याचा निर्णय गत दोन महिन्यांपूर्वीच झाला आहे. त्यामुळे युवा स्वाभिमान पार्टीने बडनेरा मतदारसंघाची सूक्ष्म बांधणी केली आहे. शहरी, ग्रामीण अशा दोन टप्प्यात प्रचाराची रणनीती आखली जात आहे. उमेदवारी पक्की असल्यामुळे आम्ही निश्चत आहोत, असे युवा स्वाभिमान पार्टीचे प्रवक्ता गणेशदास गायकवाड यांनी सांगितले. निवडणूक आता जाहीर झाली असली तरी महिला, युवकांचे मेळावे फार पूर्वीपासून घेण्यात येत आहेत. विकासाच्या बळावरच युवा स्वाभिमानची वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.

वायएसपींकडून चौथ्यांदा संधी बडनेरा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी रवी राणा यांनी ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीकडे अर्ज दाखल केला होता. त्याअनुषंगाने बडनेरातून चौथ्यांदा राणांना उमेदवारी देण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतल्याची माहिती वायएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष नीळकंठ कात्रे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून दिली. राणा यांच्या अर्जावर संसदीय समितीने प्रस्ताव मांडून एकमताने संमती दिली. यावेळी पत्रपरिषदेला जयंत वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, कमलकिशोर मालाणी, विनोद जायलवाल, संजय मुनोत, शिवदास घुले, सत्येंद्रसिंग लोटे, गणेशदास गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amravatiअमरावतीbadnera-acबडनेराRavi Ranaरवी राणा