अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात आढळला दुर्मिळ गजरा साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 10:53 IST2018-05-10T10:52:58+5:302018-05-10T10:53:05+5:30
देशात अत्यल्प नोंदी असलेला दुर्मिळ गजरा साप दर्यापूर येथील बनोसा भागातील शिवाजीनगरात सर्पमित्र राज वानखडे व विशाल ठाकूर यांना आढळला. त्या सापाला पकडून चंद्रभागा नदीत सुखरूप सोडले.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात आढळला दुर्मिळ गजरा साप
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशात अत्यल्प नोंदी असलेला दुर्मिळ गजरा साप दर्यापूर येथील बनोसा भागातील शिवाजीनगरात सर्पमित्र राज वानखडे व विशाल ठाकूर यांना आढळला. त्या सापाला पकडून चंद्रभागा नदीत सुखरूप सोडले.
दर्यापुरातील वातावरण आणि अन्नाची अनुकुलता या दुर्मिळ सापाला आकर्षित करीत असल्याचे मत सर्पमित्रांनी व्यक्त केले. बनोसा भागातील शिवाजीनगरात पप्पू टापरे यांच्या घरी साप दिसल्याची माहिती सर्पमित्र राज वानखडे व विशाल ठाकूर यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात त्यांनी त्या सापाचा शोध घेतला. तो भारतीय मृदू म्हणजेच गजरा प्रजातीचा दुर्मिळ साप असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
गजरा हा साप बिनविषारी असून, त्याची अधिकतम लांबी २२ इंच असते. मात्र, या सापाची लांबी १६ इंच नोंदविली गेली. सुरळी, पाल, सरडा, लहान बेडूक हे त्याचे मुख्य भक्ष्य आहेत.