दर्यापुरात भाजयुमो शहराध्यक्षासह अन्य एकावर खंडणीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:09 IST2021-06-30T04:09:31+5:302021-06-30T04:09:31+5:30
पोलीस सूत्रानुसार, भाजयुमो शहराध्यक्ष रोशन कट्यारमल (रा. गांधीनगर) व अशफाक ऊर्फ राजाभाई हारून घाणीवाले (रा. कच्छीपुरा) अशी ...

दर्यापुरात भाजयुमो शहराध्यक्षासह अन्य एकावर खंडणीचा गुन्हा
पोलीस सूत्रानुसार, भाजयुमो शहराध्यक्ष रोशन कट्यारमल (रा. गांधीनगर) व अशफाक ऊर्फ राजाभाई हारून घाणीवाले (रा. कच्छीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी डॉक्टर इक्बाल पठाण यांनी दर्यापूर ठाण्यात सोमवारी यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यांच्या एकता हॉस्पिटलला कोविड-१९ हेल्थ केअर सेंटर सुरू करण्याची शासनाने मंजुरी दिली होती. तेव्हापासून आरोपी स्वतःच्या फेसबूक अकाऊंटवरून या हॉस्पिटलची बदनामी करीत आहे. डॉक्टरांनी समजाविले असता, रोशनने तीन लाख रुपये द्या, बदनामी थांबवितो, करणे बंद करतो असे सांगितले. अखेर ५० हजार रुपये घेतले तरी बदनामी करणे सुरूच ठेवले तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दर्यापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदविला. यासंदर्भात डॉ. इक्बाल पठाण यांनी मंगळवारी पत्रपरिषद घेऊन आरोपींशी झालेला संवाद पोलिसांकडे सोपविल्याचे सांगितले.