अमरावती/ संदीप मानकर
शहरात शॉर्टकटसाठी राँगसाईड ही चुकीचीच असून, यामुळे अनेकांना आपला जीवसुद्धा गमावावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत शॉर्टकटसाठी राँगसाईड वाहने चालविणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, यात समोरून येणाऱ्या वाहनचालकांचा अंदाज चुकतो व त्यामुळे अपघाताच्या घटना शहरात अलीकडे वाढीस लागल्या आहेत.
शहरात रस्ते अपघातात पाच महिन्यांत ३८ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहेत. त्यामुळे शॉर्टकटसाठी राँगसाईड वाहन न चालविता नियमात वाहने चालवली तरी वाहनचालकांचा व इतरांचा जीव वाचवू शकतो, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.
ही आहेत राँगसाईड स्पॉट
१) शिवाजीनगर
शिवाजीनगर येथे क्रीडा संकुल आहे. तसेच येथे अनेक शाळा महविद्यालये आहेत. परंतु महाविद्यालयातील विद्यार्थांना संस्कृतिक भवनकडे जायचे असल्यास ते बाबा कॉर्नरजवळून नियमात वाहन न वळविता राँगसाईड येऊन डिव्हायडरजवळून वाहन काढते त्यामुळे इर्विनकडून येणाऱ्या भरधाव वाहनांना अडचण निर्माण होऊन अपघाताची शक्यता असते.
२) मालवीय चौकातील उड्डाणपूल
इर्विन चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख बँकेजवळील दुभाजकाजवळ बॅरिकेड्स लावून हा रस्ता बंद केला आहे. वाहनचालकांना इर्विन चौकात यायचे असल्यास मालवीय चौकातून येणे अपेक्षित आहे. परंतु, काही चालक थेट उड्डाणपुलावरून वाहन राँगसाईड पलटून परत इर्विन चौकात येतात. त्यामुळे राजापेठकडून येणाऱ्या वाहनचालकांना अडचण निर्माण होते.
३) वाहतूक कार्यालयानजीक
काही वाहनचालक पेट्रोलपंपावर पेट्रोलभरण्याकरिता राँगसाईड वाहने नेताना शॉर्टकट निवडतात. त्यांनी इर्विन चौकातून वळण घेऊन पेट्रोलपंपावर येणे अपेक्षित असताना वाहतूक शाखेजवळील दुभाजकाजवळून ते राँगसाईड वाहने नेत असल्याचे आढळून आले.
पॉइंटर
शहरातील वर्षभरातील अपघात-४५३
मृत्यू- ८१
जखमी- २७४
राँगसाईडच्या वर्षभरातील केसेस ११३
दंड - १, १३०००
जखमी -
राँगसाईड : वषर्भरात जमा झाले लाखो रूपयांचा दंड
राँगसाईड वाहन चालविले तर वाहतूक पोलीस प्रत्येक एक हजाराचा दंड देतो. अशा वर्षभरात ११३ कारवाया करण्यात आल्या असून शहर वाहतूक पोलिसांनी १ लाख १३ हजाराचा दंड ठोठावला आहे. अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली.
बॉक्स:
पोलीस असून नसून
वाहतूक पोलीस हे मुख्य चौकात कार्यरत असतात मात्र शिवाजीनगरातील क्रीडा संकुल येथे पोलीस कर्तव्याावर नसल्याने या ठिकाणी राँगसाईड वाहन चालकांची संख्या अधिक आहे. डिव्हायडर क्रॉस करताना अनेकांचे अपघात झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला. तसेच पीडीएमसी चौकात दवाखाना असल्याने या ठिकाणीसुद्धा वाहने राँगसाईड येतात. पण पोलीस कर्तव्यावर नसतात. त्यामुळे पोलीस असूनही नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांची आहे.
कोट
राँगसाईड वाहन चालविताना आढळून आल्यास त्याला २०० ते १ हजारापर्यंत दंडाची तरतूद आहे. जीव अनमोल आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन केलेच पाहिजे. यासाठी आम्ही वाहतूक जनजागृती अभियानसुद्धा राबवितो. किशोर सूर्यवंशी, प्रभारी सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक)