वन अधिकाऱ्यांच्या आरा गिरण्यांवर धाडी
By Admin | Updated: September 18, 2014 23:28 IST2014-09-18T23:28:40+5:302014-09-18T23:28:40+5:30
बेसुमार वृक्षतोड आणि पर्यावरणाला होत असलेला धोका रोखण्यासाठी शासनाने वनसंरक्षणाचे मापदंड ठरविले आहे. त्यानुसार वनअधिकाऱ्यांनी आरागिरण्यांची दरदिवशी तपासणी चालविल्याने

वन अधिकाऱ्यांच्या आरा गिरण्यांवर धाडी
अमरावती : बेसुमार वृक्षतोड आणि पर्यावरणाला होत असलेला धोका रोखण्यासाठी शासनाने वनसंरक्षणाचे मापदंड ठरविले आहे. त्यानुसार वनअधिकाऱ्यांनी आरागिरण्यांची दरदिवशी तपासणी चालविल्याने हे नवे मापदंड आरागिरण्यांच्या मुळावर घाला घालणारे ठरत आहेत.
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाचे सहसचिव यु. एम. फारुकी यांनी १३ आॅगस्ट २०१४ रोजी शासन आदेश पारीत करुन वनसंरक्षणाच्या दृष्टीने नवे मापदंड ठरविले आहे. यामध्ये वनजमिनींवर होणारे अतिक्रमण रोखणे, नियतक्षेत्रे तपासणी, आरागिरण्या तपासणी, वनगुन्हाची तत्परतेने नोंद, चौकशी व तपास, अवैध वृक्षतोड प्रकरणात कार्यवाही, वनसंरक्षणाबाबत दैंनदिनी अहवाल सादर करणे, वन्यप्राण्यांच्या श्किारी रोखण्यासाठी वनअधिकाऱ्यांनी विशेष दखल घेणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. वनसंरक्षणाचे नवे मापदंड लाग करताना आरागिरण्यात सुरु असलेला गैरप्रकार थांबविण्यासाठी उपवनसंरक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आरागिरण्यांच्या तपासणीचे मापदंड ठरविण्यात आल्याने मुख्य वनसंरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकारी असा तपासणीचा प्रवास राहणार आहे. दरमहा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ८ ते १० आरागिरण्यांची तपासणी करुन वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.