शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राणा म्हणतात, पटेलांना बच्चू कडूंनीच पाठविले शिदेसेनेत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 11:07 IST

गौप्यस्फोट : शिंदे-कडू यांच्यात राजकीय 'फिक्सिंग'चा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : प्रहारचे मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल यांना शिवसेना शिंदे गटात पाठविण्याची खेळी बच्चू कडू यांचीच आहे. खरे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात राजकीय 'फिक्सिंग' असून महायुतीतून शिंदेसेनेने राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिल्यास आम्ही विरोधात काम करू, असा इशारा युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक तथा आमदार रवी राणा यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी धारणी येथे एका कार्यक्रमात आमदार राजकुमार पटेल हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर तोफ डागली. आमदार बच्चू कडू हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत महायुतीत आले. त्यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपद भूषविताना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळविला. एवढेच नव्हे तर वाय प्लस सुरक्षादेखील मिळवली. असे असताना आमदार कडू यांनी कधीच महायुतीचा धर्म पाळला नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात काम केले, हे सर्वश्रुत आहे. म्हणूनच आमदार पटेल यांना शिंदेसेनेत पाठविणे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात राजकीय साटेलोटे आहे, असा आरोपही आमदार राणा यांनी केला. 

मात्र, आमदार कडू आणि राजकुमार पटेल यांना कोणतीही खेळी करू द्या, त्यांचा येत्या विधानसभा निवडणुकीत हिशेब करणार, असा इशारा आमदार राणा यांनी दिला आहे. आमदार बच्चू कडू यांचे राजकारण म्हणजे 'बाप बड़ा ना भय्या, सबसे बडा रुपया' अशा प्रकारे आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे. याप्रकरणी बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर अमरावती जिल्ह्यात राजकीय धूमशान मोठ्या प्रमाणात सुरू असून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

म्हणूनच शिंदेसेनेत गेलो : राजकुमार पटेल आ. बच्चू चू कडू कडू यांनी तिसरी आघाडी स्थापन केली. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाणार नाही, असे त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. दरम्यान मला राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून पक्षात येण्याची ऑफर होती. मात्र, प्रत्यक्षात मी जेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांना भेटलो अन् तिसऱ्या आघाडीतून निवडणूक लढणार नाही, असे त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी लागलीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करा, अशी ऑफर दिली होती. तसेही मुख्यमंत्री शिंदे यांनी मेळघाटच्या विकासासाठी भरीव निधी दिला आहे. त्यांच्याशी अगोदरपासूनच जवळीक होती. मुख्यमंत्री हे जिंदादिल माणूस असून त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे आ. राजकुमार पटेल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाBachhu Kaduबच्चू कडूRajkumar Patelराजकुमार पटेलAmravatiअमरावती