राजना रस्त्याची झाली घसरगुंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST2021-07-19T04:10:42+5:302021-07-19T04:10:42+5:30
अनेकांचा अपघात, पुलाखाली पाणी चांदूर रेल्वे : शहरापासून जवळच असलेल्या राजना गावात जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे प्रचंड चिखल जमा झाल. ...

राजना रस्त्याची झाली घसरगुंडी
अनेकांचा अपघात, पुलाखाली पाणी
चांदूर रेल्वे : शहरापासून जवळच असलेल्या राजना गावात जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे प्रचंड चिखल जमा झाल. आहे. या रस्त्यावरून राजना गावात ये-जा करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची पूर्णतः घसरगुंडी झाल्याने अनेकांचा अपघात झालेला आहे.
रेल्वे स्टेशन परिसरातून राजना गावात जाणारा रस्ता आहे. परंतु पावसाने हा रस्ता पूर्णतः चिखलात दबून जातो. अनेक दुचाकीस्वार येथे घसरून पडत आहेत. याच मार्गावरील सिलिंडरच्या गोदामजवळ रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली आहे. शहरात शेतीच्या कामासाठी तसेच दवाखान्यानिमित्त शहरात येत असतात. परंतु, दुसऱ्या मार्गाने रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने थोडाही पाणी आल्यास गावाचा संपर्क तुटतो. काल झालेल्या पावसाने रस्त्याच्या आजूबाजूची पूर्ण माती रस्त्यावर आली. त्यामुळे रस्त्यावर चिखल बनून रस्त्याची घसरगुंडी बनल्याचे पाहायला मिळते तर अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावरून घसरून पडल्याचेही दिसून आले. बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज दिसून येत आहे.
180721\1618-img-20210718-wa0021.jpg
photo