१२ जुलैपर्यंत पाऊसच पाऊस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 00:07 IST2016-07-07T00:07:34+5:302016-07-07T00:07:34+5:30

विदर्भात ६ ते १२ जुलैपर्यंत कमी अधिक पाऊस तर, सातपुडा भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.

Rainfall till July 12 ... | १२ जुलैपर्यंत पाऊसच पाऊस...

१२ जुलैपर्यंत पाऊसच पाऊस...

हवामान तज्ज्ञांचा अंदाज : सातपुडा भागात मुसळधार पावसाची शक्यता
अमरावती : विदर्भात ६ ते १२ जुलैपर्यंत कमी अधिक पाऊस तर, सातपुडा भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. त्यामुळे विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊसच पाऊसच बरसणार आहे.
हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या अंदाजानुसार बिहार आणि उत्तर प्रदेशवरील ठळक दाबाचे क्षेत्र आणखी तिव्र होऊन त्याचे रुपांतर वादळात होण्याची शक्यता आहे. पंजाब ते उपबंगाल कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. गुजरात ते केरळ मान्सून टॅ्रफ कायम आहे. कच्छ प्रांतावर चक्राकार वारे कायम आहे, जे विदर्भात पाऊस पडण्यासाठी सहायक ठरत आहे. या स्थितीमुळे विदर्भात १२ जुलैपर्यंत कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील काही भागात मुसळधार तर काही भागात केवळ तुरळक पाऊसच पडला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले तर काही दुखावले सुध्दा आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून अपेक्षित पाऊस पडण्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे.

सातपुडा भागात मुसळधार
मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्याच्या सिमेलगतचा सातपुडा पर्वतरागाकडील भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ बंड यांचे मत आहे. अमरावती जिल्ह्याच्या सिमेवर सातपुडा पर्वतरांगा असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

असा राहील विदर्भातील पावसाचा अंदाज
६ जुलै - अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार
७ जुलै - बऱ्याच ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी मुसळधार
८ जुलै - काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात पाऊस
९ जुलै - विखुरलेल्या स्वरुपात हलका, तुरळक ठिकाणी मुसळधार.
१२ जुलै - या तारखेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस.

Web Title: Rainfall till July 12 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.