परतवाड्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:11 IST2021-05-17T04:11:40+5:302021-05-17T04:11:40+5:30

फोटो - परतवाडा : रविवारी दुपारी ३ वाजता अचानक सोसाट्याचा वारा सुटला. त्याने चक्रीवादळाचे रूप धारण केले आणि पाठोपाठ ...

Rain with gusts in the backyard | परतवाड्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस

परतवाड्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस

फोटो -

परतवाडा : रविवारी दुपारी ३ वाजता अचानक सोसाट्याचा वारा सुटला. त्याने चक्रीवादळाचे रूप धारण केले आणि पाठोपाठ अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. परतवाडा-अमरावती मार्गावर मोठ्या प्रमाणात कडुनिंबाच्या झाडांच्या फांद्या आल्या. भूगावनजीक रस्त्यावर झाड कोसळले, तर अष्टमासिद्धी फाट्यानजीकसुद्धा झाडाच्या फांद्यांचा खच होता.

अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने अगोदरच दिला होता. त्यानुसार अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागासह शहरातील विद्युत पुरवठा काही वेळेसाठी खंडित झाला होता. अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, परसापूर, मल्हारा, देवगाव आदी ग्रामीण भागातसुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली.

बॉक्स

नंदनवनात बरसला पाऊस

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर रविवारी दुपारी ३.३० वाजता १५ मिनिटांकरिता अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पर्यटनस्थळावरील वातावरण अजूनच थंड झाले आहे. तालुक्यातील काटकुंभ, सेमाडोह, चुरणी, हतरू भागातसुद्धा ढगाळ वातावरण होते.

-------------

अचलपुराला वादळी पावसाने झोडपले

अचलपूर : शहरात दुपारी ३ वाजता जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन झाले. वादळी वाऱ्यांमुळे अचलपूर-परतवाडा-अमरावती रोडवरील कडुनिंबाची अनेक झाडे तुटून पडली. अचलपूर शहरातील विविध भागांत त्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील टिनाचे छप्पर उडाले.

Web Title: Rain with gusts in the backyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.