गौरखेडा येथे दारूच्या गुत्त्त्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:28 IST2020-12-14T04:28:42+5:302020-12-14T04:28:42+5:30
दोन कारवाया : दोन महिलांविरुद्ध गुन्हा चांदूर रेल्वे : तालुक्यात अवैध गावठी दारूचा सर्वात मोठा अड्डा मानल्या जाणाऱ्या ...

गौरखेडा येथे दारूच्या गुत्त्त्यावर धाड
दोन कारवाया : दोन महिलांविरुद्ध गुन्हा
चांदूर रेल्वे : तालुक्यात अवैध गावठी दारूचा सर्वात मोठा अड्डा मानल्या जाणाऱ्या गौरखेडा शिवारातील गुत्ता उद्ध्वस्त करण्यात आला. येथील दोन कारवाईमध्ये १ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. दोन महिला आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी पहिल्या कारवाईमध्ये गौरखेडा शेतशिवारातील गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. तेथून १६ ड्रम मोहा माच, दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ८६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सडवा नष्ट करण्यात आला. यामध्ये एका २४ वर्षीय महिला आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली. याच शिवारातील अन्य एका अड्ड्यावर धाड टाकून चार ड्रम मोहा सडवा, १५ लिटर गावठी दारू असा एकूण ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. यात एका २० वर्षीय महिलेविरुद्ध कारवाई करण्यात आली. सदर दोन्ही कारवाई ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात करण्यात आली.