फ्रेजरपुरा हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:10 IST2021-06-19T04:10:03+5:302021-06-19T04:10:03+5:30

अमरावती : पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकासह शहर गुन्हे शाखेने फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील शासकीय विश्रामगृह परिसरातील आऊट हाऊससमोर संयुक्त कारवाई ...

Raid on a gambling den in Frazerpura area | फ्रेजरपुरा हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड

फ्रेजरपुरा हद्दीत जुगार अड्ड्यावर धाड

अमरावती : पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकासह शहर गुन्हे शाखेने फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील शासकीय विश्रामगृह परिसरातील आऊट हाऊससमोर संयुक्त कारवाई करून सहा आरोपींना शुक्रवारी ताब्यात घेतले. आरोपींकडून जुगार साहित्यासह २ लाख ६० हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीससूत्रानुसार, चंद्रशेखर ठाकरे (५७), सुभाष कराळे (६१), राजेंद्र मोतीराम कडू (४६), सुभाष राठोड (५२), अशोक ढोले (५६), सुभाष खंडारे (५६) सदर आरोपी जुगार खेळताना पोलिसांना मिळून आले. त्यांच्याकडून ३६ हजार ९० रुपये नगदी, पाच मोबाईल, पाच दुचाकी असा एकूण २ लाख ६० हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. ही कारवाई पोलीस आयुक्त आकरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज चक्रे, पोलीस हेड कॉन्सटेबल राजेंद्र काळे, पोलीस कॉन्सटेबल सुलतान, विशाल वाकपांजर, सुरज चव्हाण, सूरज मेश्राम, निखिल गेडाम, राजिक यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Raid on a gambling den in Frazerpura area