धार्मिक स्थळी रस्त्याच्या वादातून चिंचोलीत राडा
By Admin | Updated: August 17, 2014 22:52 IST2014-08-17T22:52:59+5:302014-08-17T22:52:59+5:30
बौध्द विहार आणि हनुमान मंदिराच्या रस्त्याच्या जागेच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत १० जण जखमी झाले. तर एकाची प्रकृती गंंभीर आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या

धार्मिक स्थळी रस्त्याच्या वादातून चिंचोलीत राडा
१० जण जखमी : २४ जणांविरूध्द गुन्हे दाखल, १४ जणांवर अॅट्रोसिटी
चांदूरबाजार : बौध्द विहार आणि हनुमान मंदिराच्या रस्त्याच्या जागेच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत १० जण जखमी झाले. तर एकाची प्रकृती गंंभीर आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यांतर्गत चिंचोली (ब्राह्मणवाडा) येथे घडली.
चिंचोली येथे बौध्द विहार व हनुमान मंदिर आजुबाजूला आहे. या दोन्ही धार्मिक स्थळांच्या बाजूला मोकळी जागा आहे. या जागेतील सार्वजनिक रस्त्याचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे.
सन १९९३ मध्ये अशोक बनसोड हे सरपंच असताना त्यांनी रस्त्याच्या वादावर सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार या मार्गावर तात्पुरते लोखंडी दारही लावण्यात आले होते. याच दरम्यान हनुमान मंदिराच्या संक्षक भिंतीचे काम सुरू झाले. त्यामुळे रस्त्याच्या मुद्यावरून पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले.