यंदा ४० हजार हेक्टरने रबीची क्षेत्रवाढ
By Admin | Updated: October 22, 2015 00:09 IST2015-10-22T00:09:30+5:302015-10-22T00:09:30+5:30
यंदाच्या रबी हंगामात जिल्ह्यात २ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.

यंदा ४० हजार हेक्टरने रबीची क्षेत्रवाढ
२ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र : सर्वाधिक दीड लाख हेक्टरमध्ये हरभरा
लोकमत विशेष
अमरावती : यंदाच्या रबी हंगामात जिल्ह्यात २ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. गतवर्षीच्या १ लाख ७४ हजार ६९७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३९ हजार ३०३ हेक्टर इतकी क्षेत्रवाढ आहे. यामध्ये ७५ टक्के हेक्टर हरभऱ्याचे विक्रमी क्षेत्र असून ६० हजार क्षेत्रात गहू राहणार आहे.
खरिपाचा हंगाम कमी पावसामुळे महिनाभर माघारला होता. त्यामुळे रबीचा हंगाम देखील उशिराने सुरू झाला आहे. सद्यस्थितीत २० हजार हेक्टरमध्ये रबीची पेरणी झाली आहे. यंदा कृषी विभागाद्वारे अमरावती तालुक्यात १५ हजार ३०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. चांदूररेल्वे १० हजार ६० हेक्टर, धामणगाव २५ हजार ६०० हेक्टर, नांदगाव खंडेश्वर १४ हजार ६३० हेक्टर, भातकुली तालुक्यात १२ हजार ६७० हेक्टर, मोर्शी तालुक्यात १२ हजार ४०० हेक्टर, वरूड तालुक्यात १६ हजार ५१० हेक्टर, तिवसा १४ हजार ५७० हेक्टर, चांदूरबाजार १२ हजार ७७० हेक्टर, अचलपूर १३ हजार ७०० हेक्टर, दर्यापूर २८ हजार ७६० हेक्टर, अंजनगाव सुर्जी १२ हजार १३० हेक्टर, धारणी १७ हजार ५०० हेक्टर व चिखलदरा तालुक्यात ७ हजार ४०० हेक्टर रबीचे क्षेत्र आहे. रबीसाठी १ लाख ४८ हजार ८९० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. मागील वर्षी ६१ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी करण्यात आली होती. हरभऱ्याचे १ लाख १० हजार ५६९ हेक्टर क्षेत्र होते. ईतर २ हजार २७५ हेक्टर क्षेत्र असे १ लाख ७४ हजार ६९७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. यंदा रबीच्या २ लाख १४ हजार हेक्टरचे नियोजन आहे. ६० हजार हेक्टरमध्ये गहू, दीड लाखमध्ये हरभरा व ४ हजार हेक्टरमध्ये ईतर पिके राहणार आहेत.
६० हजारात हेक्टरमध्ये गहू
जिल्ह्यात यंदा ६० हजार हेक्टर क्षेत्रात गहू पीक राहणार आहे. सर्वाधिक १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्र धामणगाव तालुक्यात आहे. खारपाण पट्टा असणाऱ्या दर्यापूर तालुक्यात ५०० हेक्टरमध्ये सोयाबीन राहणार आहे.
अशी होणार क्षेत्रवाढ
यंदा रबीच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत ३९ हजार ३०३ हेक्टरने क्षेत्रवाढ होत आहे. यामध्ये अमरावती ६ हजार ७८० हेक्टर, चांदूररेल्वे ३५७८, धामणगाव ४६५१, नांदगाव ४८६२, भातकुली ४७२६, मोर्शी ४२३९, वरूड ५८४७, तिवसा ४१४८, चांदूरबाजार ४२९१, चांदूरबाजार ६२६६, अंजनगाव ५३८६, दर्यापूर ८१६८, धारणी २८२४ व चिखलदरा तालुक्यात २७८६ हेक्टर क्षेत्र वाढणार आहे.
दर्यापुरात सर्वाधिक हरभरा क्षेत्र
यंदा दीड लाख हेक्टरमध्ये हरभऱ्याचे क्षेत्र प्रस्तावित आहे. यामध्ये दर्यापूर तालुक्यात सर्वाधिक २८ हजार हेक्टरमध्ये हरभरा राहणार आहे. चिखलदरा तालुक्यात सर्वात कमी ४ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.